दापचरी चेक पोस्टचा प्रवास खड्ड्याखड्ड्यातून

By Admin | Published: July 6, 2017 05:45 AM2017-07-06T05:45:24+5:302017-07-06T05:45:24+5:30

मुंबई अहमदाबाद महामार्गावरील दापचरी सीमा तपासणी नाक्याच्या अंतर्गत असणाऱ्या रस्त्याची दुर्दशा झाली असून हा प्रमुख महसुली नाका

Journey of Dapchari check post from pothole | दापचरी चेक पोस्टचा प्रवास खड्ड्याखड्ड्यातून

दापचरी चेक पोस्टचा प्रवास खड्ड्याखड्ड्यातून

googlenewsNext

शौकत शेख/लोकमत न्यूज नेटवर्क
डहाणू : मुंबई अहमदाबाद महामार्गावरील दापचरी सीमा तपासणी नाक्याच्या अंतर्गत असणाऱ्या रस्त्याची दुर्दशा झाली असून हा प्रमुख महसुली नाका असल्याने वाहनांची वर्दळही मोठी असते. खड्ड्या खड्ड्यांच्या रस्त्यामुळे येथे दररोज लहान मोठे अपघात घडत आहेत. बांधा, वापरा व हस्तांतरण करा (बीओटी) या तत्वावर शासनाने ठेका दिलेल्या सदभाव इंजिनियरिंग या कंपनीचे याकडे सप्शेल दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे.
बांधा, वापरा आणि हस्तांतरण करा या तत्वावर राज्य शासनाने सदभाव इंजिनियरींग कंपनीला दापचरी येथील चेक पोस्ट दिले आहे. परंतु, मुंबई-गुजरातकडे जाणाऱ्या वाहनांकडून सेवा सुविधांसाठी सक्तीने सर्व्हीस टॅक्स वसूल करून ही ठेकेदार कंपनी आवश्यक सेवा सुविधाकडे डोळे झाक करीत असल्याने सद्भाव कंपनीबाबत वाहनचालकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
गुजरात कडून मुंबई वाहिनीवर येत असतांना दापचरी येथील सीमा तपासणी नाक्यावर सर्व्हीस टॅक्स, रोड टॅक्स, इत्यादी कर भरून बाहेर पडले असता मुंबई हायवेला लागूनच असलेल्या चेक नाक्याच्या रस्त्याला मोठ मोठाले खड्डयांचा सामना करावा लागतो.
त्या खोल खड्डयांमध्ये पाणी साचून डबकी तयार झाल्याने वाहन चालकांना बाहेर पहतांना प्रयास करावे लागतात. त्यातच गाडी चालवतांना कुणाला धक्का लागल्यास रस्त्यावरच तंटा सुरु होऊन मागे वाहनांच्या रांगा लागतात.

आरटीओचाही ढिसाळ कारभार : दापचरी आरटीओ नाका सर्वात मोठा तपासणी नाका आहे येथे प्रादेशिक परिवहन विभागाला दररोज २१ लाखाचा महसूल प्राप्त होतो. या नाक्यावर दररोज मुंबई-अहमदाबाद कडे जाणाऱ्या ट्रान्सपोट कंपनीच्या गाडयांना पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नसून अनेक प्रकारच्या गैरसोयी आहेत. अस्ता व्यस्त पडलेले बेरीकटर्स, खडीचे ढिगारे, मार्ग फलकाचा अभाव, इकडे तिकडे पडलेले बांधकाम साहित्यामुळे वाहनचालकांना बाहेरचा मार्ग काढणे जिकरीचे झाले आहे.

वसूली हाच एक कलमी कार्यक्रम

गुजरात व महाराष्ट्रातील अवजड वाहने हाकने तारेची कसरत ठरत आहे.
त्यामुळे सर्व्हीस टॅक्स भरून त्याचा काय उपयोग असा सवाल वाहन चालकांकडून होत आहे.
विशेष म्हणजे सदभाव इंजिनियरींग कंपनी प्रत्येक वाहनांकडून १३५ रूपये वसूल करते. त्यातून दररोज लाखेचा महसूल गोळा केला जातो.
परंतु, टोल नाकेच खड्डेमय झाले असून कंपनीला केवळ वसूलीचाच एक कलमी कार्यक्रम राबवायचा आहे की, काय असा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे.

पाऊस सुरू असल्यामुळे खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले नाही. पाऊस थांबताच खड्डे बुजविले जातील.
-सुरेंद्र गेडाम, जनरल मॅनेजर, सदभाव इंजिनियरींग कंपनी दापचरी

Web Title: Journey of Dapchari check post from pothole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.