पाणजूवासीयांच्या नशिबी बोटीचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:17 AM2019-05-20T00:17:14+5:302019-05-20T00:17:20+5:30

वसई तालुक्यातील इतिहासकालीन गाव : पोकळ आश्वासने आणि राजकीय दुर्लक्षितता

The journey of the destroyers of the Panjuviyas | पाणजूवासीयांच्या नशिबी बोटीचा प्रवास

पाणजूवासीयांच्या नशिबी बोटीचा प्रवास

googlenewsNext

- आशिष राणे 


वसई : भार्इंदर व नायगांव रेल्वे स्थानका दरम्यान असलेले आणि वसई तालुक्याच्या नकाशावरील एक बेट म्हणून चारी बाजूने पाण्याने वेढलेले असे नुकतेच केंद्र व राज्य सरकारच्या दृष्टिक्षेपात पडलेले हिरवेगार, रमणीय ‘पाणजू’ हे निसर्गरम्य गाव इतिहासकालीन आहे. या गावाची विशेष ओळख म्हणजे गावात जायला मुख्य असा कुठलाही रस्ता अथवा पादचारी पूल आजही स्वातंत्र्यांनंतर सुद्धा अस्तित्वात नाही. किंबहुना खरी शोकांतिका म्हणजे गावात फेरी बोटी शिवाय कुठलाही पर्याय नाही.


एकंदरीतच बोटीचा प्रवास ही बाब मुख्यत: पर्यटनासाठी उत्तम व चांगली वाटते, मात्र पाणजू वासियांच्या नशिबी मात्र आयुष्यभर फेरी बोटीनेच प्रवास लिहिला आहे. मग ऋ तू कुठलाही असो. या पाणजू गावात जाण्यासाठी नायगांव पश्चिमेस असलेल्या जेटी वरून फेरी बोट पकडावी लागते. ती गावकऱ्यांना ६ रु पये प्रती माणसी व बाहेरील व्यक्तीला १० रु पये भाडे आकारते. वसई तालुक्यातील जवळ-जवळ दोन हजारच्या लोकवस्तीचे हे गाव इतिहासकालिन नरवीर चिमाजी अप्पांच्या काळापासून अस्तित्वात असून ग्रामपंचातीकडून या गावाचा कारभार चालतो. मात्र, पलिकडच्या तिरावरील नायगाव हे गाव मात्र वसई-विरार शहर महानगरपालिकेत येते.


सरकारने हे पाणजू गाव नीती आयोगाच्या अखत्यारीत आणून या गावाला पर्यटन स्थळ म्हणून विशेष दर्जा देण्याचे घोषित केले आहे. तसेच येथील मुख्य रस्त्याचा विषय असेल अथवा गावातील सोयीसुविधा पाहता या संदर्भात पाणजू ग्रामपंचातीचे सरपंच आशिष भोईर यांनी सर्व योजनांती माहिती दिली.


पाणजू गावात प्रामुख्याने आगरी, कोळी समाजाची बºयापैकी वस्ती असून ग्रामस्थांचा शेती, रेती, मिठागर , भाजीपाला छोटी दुकाने, फेरी बोटी असे पारंपरिक व्यवसाय असून रेती बंद असल्याने हा धंदा व रोजगार बुडाला आहे. त्यामुळे शंभर ते दीडशे बोटी किनाºयावर धूळखात उभ्या आहेत.


गावात वीज आहे, मात्र ही वीज व्यवस्था १९७९ साली आली तर गावात १२० वर्षे जुनी एक माध्यमिक शाळा आहे. विशेष म्हणजे गावात जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र असून डॉक्टर व पारिचारीकांचे एक उत्तम पथक आहे. खास म्हणजे पाणी सेवा मुबलक असून गावात घराघरात नळ सेवा देण्यात आली आहे.


स्वातंत्र मिळाले मात्र गावातील लोकांना ७० वर्ष झाली तरी अजून ही हक्काचा रस्ता नाही. या गावामध्ये निवडणुका आल्या की, राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी रस्ता देण्याचे गाजर दाखवत असतात मात्र, नंतर रस्त्याच्या प्रश्नाकडे पाठ फिरवतात. खासदार आणि आमदारांसह सर्वच राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी एखादी दुर्घटना घडल्यावरच या पाणजू बेटावरील गावाला भेट देतात. गेली ७ दशके पाणजूवासीय बोटीने प्रवास इतरांच्या संपर्कात राहतता.


रस्त्याबाबतच्या शासकीय योजना फक्त कागदोपत्रीच रंगवल्या जातात, मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नाही. रेल्वेच्या आडमुठ्या धोरणामुळे रेल्वे पुल देखील धुळखात पडला आहे या धोरणात बदल झाल्यास गावकऱ्यांची समस्या सुटणार आहे.

पावसाळ्यात गावकºयांचा बोटीचा प्रवास जीवघेणा

पावसाळ्यामध्ये पाणजु गावातील रिहवासी आपला जीव मुठीत घेऊन जुन्या रेल्वे पुलावरु न प्रवास करतात, परंतु कधी-कधी वादळवारे व रेल्वेच्या स्लीपरमधील अंदाज ‘न’ आल्यामुळे अनेक जण मृत्यूमुखी पडतात.
सुमारे दोन वर्षांपूर्वी बोटीमध्ये लग्नाची वरात जात असताना बोट उलटून काही जण दगावल्याची घटना देखील घडली आहे. अशा घटना घडल्यावर राजकीय प्रतिनिधी घटनास्थळी पोहचतात व रस्ता देण्याचे आश्वासन देतात, अशी आश्वासने अनेक वेळा देऊन झाली आहे.
नायगांव ते भार्इंदर पर्यंत नवीन पुल मंजुर देखील झाला आहे. परंतु त्याची अंमलबजावणी मात्र होत नाही. भोईर यांच्या सांगण्यानुसार केंद्रातील भाजप व राज्यातील भाजपने आमच्या गावाकडे लक्ष देऊन महत्वाची कामे करत आहेत त्यामुळे आम्ही समाधानी असल्याचा पुर्नरु चर भोईर यांनी ग्रामस्थांच्या वतीने केला.

Web Title: The journey of the destroyers of the Panjuviyas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.