महामार्गावरील प्रवास धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 10:47 PM2019-03-15T22:47:08+5:302019-03-15T22:47:21+5:30
एका वर्षात ९५ अपघातांत ६१ जणांचा मृत्यू
कासा : धोकादायक वळने, सूचना फलकांचा अभाव, अशा अनेक कारणांमुळे महामार्गावर दिसेनिदवस अपघाताच्या संख्येत वाढ होत असून महार्गावरील प्रवास धोकादायक झाला आहे.
डहाणू तालुक्यातील कासा पोलिस ठाण्याअंतर्गत धुंदलवाडी ते वाडाखडकोना ३२ की मी महामार्ग आहे.या महार्गावर जानेवारी ते डिसेंबर २०१८ वर्ष भरात ९५ अपघात झाले आहेत व या ९५ अपघातात ६१ जणांचा मृत्यू झाला आहे आणि ४९ जण जखमी झाले आहेत. या मध्ये केवळ महालक्ष्मी ते चारोटी टोल नाका या ४ किमी अंतरावर वर्षभरात ३३ अपघात झाले असून या अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला आहे तर १३ जखमी झाले आहेत. यातील सर्वाधिक अपघात चारोटी उड्डाणपूलावर आणि एशियन पेट्रोलपंप जवळ झाले आहेत . तर जानेवारी ते फेब्रुवारी २०१९ यामध्ये ८ अपघात झाले असून त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. या धुंदलवाडी ते वाडाखडकोना ३२ कि मी अंतरावरील महामार्गवर चारोटी, महालक्ष्मी, धानीवरी धुंदलवाडी, घोळ, तवा, चिंचपाडा, सोमटा, मेंढवण या ठिकाणी छोटी मोठी उड्डाणपूल बांधली आहेत. मात्र काही ठिकाणी सर्व्हिस रोड नाही तसेच पथदिव्याची कमतरता त्यामुळे परिसरातील दुचाकीस्वारांचे व वाहनचालकांचे रात्री वळण घेताना अपघात होतात.