मच्छीमार एकत्र आल्याशिवाय न्याय अशक्य - रमेशदादा पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 03:49 AM2018-06-05T03:49:15+5:302018-06-05T03:49:15+5:30
मच्छीमार समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी मच्छीमार समाजाच्या अनेक छोट्यामोठ्या संघटना आंदोलने करीत आहेत, मात्र विविध पक्षात विभागल्या गेलेल्या संघटनांनी एकीची ताकद न दाखविल्याने समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जाते.
पालघर : मच्छीमार समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी मच्छीमार समाजाच्या अनेक छोट्यामोठ्या संघटना आंदोलने करीत आहेत, मात्र विविध पक्षात विभागल्या गेलेल्या संघटनांनी एकीची ताकद न दाखविल्याने समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जाते. त्यासाठी मच्छीमारांच्या सर्व संघटनांना एकत्र आल्याशिवाय आता पर्याय नसल्याचे वास्तव सर्वांनी स्वीकारायला हवे असे उद्गार कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील यांनी पालघर मध्ये काढले.
येथे ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्र मात उदघाटक म्हणून ते बोलत होते.या प्रसंगी नवनिर्वाचित खासदार राजेंद्र गावित, आमदार अमित घोडा, नँशनल फिशवर्कर्स फोरमचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, अखिल महाराष्ट्र कोळी संघाचे अध्यक्ष अनंत तरे, महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो, कार्यक्र माच्या अध्यक्षा ज्योती मेहेर, जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक जनार्दन तांबे,मच्छीमार समाजाच्या गायिका पुष्पाताई पागधरे, फिलिप मस्तान,अशोक नाईक, रामकृष्ण तांडेल आदी सर्व संचालक व्यासपीठावर उपस्थित होते
प्रारंभी आपल्या प्रास्ताविकेतून संस्थेचे उपाध्यक्ष मोरेश्वर वैती यांनी संस्थेचा पन्नास वर्षाच्या कारकिर्दीचा आढावा घेतला. नवनिर्वाचित खासदार राजेंद्र गावित यांचा मच्छीमार समाज संघाच्यावतीने संचालक प्रवीण ना.दवणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गानसंम्रांज्ञी पुष्पा पागधरे यांचा सत्कार संघाच्या अध्यक्षा ज्योती मेहेर यांच्या हस्ते करण्यात आला. माजी दिवंगत संस्थापक सदस्यांचे वारसदार, आजी- माजी अध्यक्ष व योगदान देणार्या मान्यवरांचा सन्मानचिन्ह , शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मान्यवरांचा हस्ते स्मरणकिेचे प्रकाशन करण्यात आले. मान्यवरांनी आपल्या मनोगताद्वारे समाजाच्या व्यथा मांडून एकजूट राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज तरे यांनी केले.