४४ घरफोड्या करणाऱ्या टोळीस केले जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 11:32 PM2019-09-13T23:32:38+5:302019-09-13T23:32:50+5:30
२१ लाख रु पयांचे ५३ तोळे सोने केले हस्तगत
नालासोपारा : स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई टीमने अशाच घरफोड्या करणाºया तीन जणांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. ४४ घरफोड्या उघड करून २१ लाख १६ हजारांचे ५२ तोळे ९०० ग्रॅम सोने हस्तगत केले आहे. नालासोपारा २०, अर्नाळा १ आणि २४ तुळिंज पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील ४४ घरफोड्या उघड केल्या आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षिका सिद्धवा जायभाये यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन पथकांनी मनोज शर्मा (२६), बबलू जयस्वाल (३०) आणि बाबू मोहिते (२२) या तिघांना पकडले आहे. तिघांनी गुन्हा कबूल केला असून त्यांनी आपली कार्यपद्धती देखील सांगितली. ते बंद घरांचा सर्वप्रथम सर्व्हे करायचे आणि नंतर त्या घरात कोणी नसताना घरफोडी केली जायची, असे तपासात सांगितले. तिन्ही आरोपींना वसई न्यायालयात हजर केले असता १६ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नालासोपारा पूर्वेकडील आचोळे रोडवरील छेडा पार्कमधील चिराग अपार्टमेंटच्या सदनिका नं. १०१ मध्ये राहणारे राजेश विसंजी भेदा (४८) यांच्या घरी २२ फेब्रुवारी २०१९ ला दुपारी चोरी केली. दरवाजाचे लॉक तोडून २ लाख ४ हजार रुपये किंमतीचे सोन्याचांदीचे दागिने चोरी करून नेल्याचा गुन्हा तुळिंज पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. याचाच तपास करत असताना या सर्व घरफोड्यांची उकल झाली आहे. यांचे कोणी साथीदार आहेत का? यांनी अजून कुठे घरफोड्या केल्या आहेत का? याचा शोध घेत पोलीस तपास करत आहे.
या दोन पथकांमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, महादेव वेदपाठक, जनार्दन मते, विकास यादव, संजय नवले, रमेश अलदर, सागर बारवकर, अश्विन पाटील, चंद्रकांत कदम, जनार्दन मते, प्रशांत पाटील, शिवाजी पाटील, गोविंद केंद्रे, अमोल कोरे, अमोल तटकरे, मुकेश तटकरे, मनोज सकपाळ, मंगेश चव्हाण, शरद पाटील, प्रशांत ठाकूर यांचा समावेश होता.
बॅगा चोरणाºया दुकलीलाही अटक
एलसीबीच्या वसई टीमने चार चाकी, टेंपो, ट्रक यामधील बॅगा चोरणाºया दुकलीलाही पकडले आहे. लखन भुतीया (२८) आणि निलेश कांबळे (३४) अशी पकडलेल्या आरोपींची नावे असून यांनी विरार, तुळिंज आणि नालासोपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोºया केल्या आहे. दोन्ही आरोपींना तपास करण्यासाठी नालासोपारा पोलिसांना आरोपी देऊन गुन्हा वर्ग केला आहे.