पर्यटकांसाठी आकर्षण ठरतोय काळमांडवी धबधबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 10:56 PM2019-07-23T22:56:59+5:302019-07-23T22:57:15+5:30
काळशेती या नदीवर ‘काळमांडवी’ धबधबा असून, येथे सध्या सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण दिसते आहे.
जव्हार : जव्हार शहरापासून अवघ्या ५ कि.मी अंतरावर असणाऱ्या झाप रोडलगत केळीचापाडा या गावातून ३ कि.मी अंतरावर काळशेती नदीवर असलेला काळमांडवी धबधबा पर्यटकांसाठी आकर्षण ठरतो आहे.
काळशेती या नदीवर ‘काळमांडवी’ धबधबा असून, येथे सध्या सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण दिसते आहे. शनिवार आणि रविवारी या सुट्टीच्या दिवशी मोठी गर्दी दिसते आहे. पावसाळा सुरु झाला की, पर्यटकांचे पाय काळ मांडवीकडे आपोआप वळतात. उन्हाळ्यात या काळमांडवी धबधब्यापर्यंत जायला काळमांडवी पर्यटन समितीने रस्ता तयार करून व्यविस्थत नियोजन केली होते. मात्र काही अडचणींमुळे ही व्यवस्था बंद झाली आहे. या धबधब्यापर्यंत सुरक्षित जायला आणि तसेच निसर्गरम्य पर्यटनाची माहिती द्यायला गाईड मिळत आहेत.
शासनाने या निसर्गरम्य पर्यटकांचा विकास केला तर नक्कीच या भागातील आदिवासी कुटुंबांना रोजगार मिळेल. उन्हाळ्यात कमी रोजगार मिळाला तरी पावसाळ्यात मात्र, ही कसर भरून निघेल, पर्यटनतज्ज्ञाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे या निसर्गरम्य पर्यटनस्थळाचा विकास करण्याची गरज आहे.