सवरा-गावितांमध्ये कलगीतुरा; सत्ताधाऱ्यांचे खासदार असल्याची करून दिली आठवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 12:40 AM2018-08-04T00:40:39+5:302018-08-04T00:40:51+5:30
जिल्ह्याचा चौथा वर्धापन दिन साजरा होत असताना जिल्ह्यातील २८ कार्यालयाचा कारभार आजही अन्य जिल्ह्यातून हाकला जात असताना रिक्त पदाना सामोरे जात अनेक तहसीलदाराना स्वत:चे वाहन नाही.
पालघर : जिल्ह्याचा चौथा वर्धापन दिन साजरा होत असताना जिल्ह्यातील २८ कार्यालयाचा कारभार आजही अन्य जिल्ह्यातून हाकला जात असताना रिक्त पदाना सामोरे जात अनेक तहसीलदाराना स्वत:चे वाहन नाही. याचा मोठा परिणाम जिल्ह्यावर होत असल्याचे खासदार राजेंद्र गावितांनी आपल्या भाषणातून मांडल्यानंतर पालकमंत्री विष्णु सवरा यांनी तुम्ही आता विरोधकाच्या भूमिकेत नसून सत्ताधाºयांचे खासदार असल्याचा आपल्याला विसर तर पडला नाही ना ?असा चिमटा काढला.
जिल्ह्याचा चौथा वर्धापन दिन १ आॅगस्ट रोजी उत्साहात पार पडला. या कार्यक्र मा प्रसंगी बोलताना खासदार गावितांनी जिल्ह्यातील चांगले काम करणाºया अधिकाºयांचा सत्कार झाल्याचे समाधान व्यक्त करीत समस्यांचा पाढाच वाचला. जिल्ह्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी, जिल्हा दुग्धविकास अधिकारी, जिल्हा न्यायालय, औद्योगिक न्यायालय आदी २८ कार्यालये जिल्हा निर्मितीनंतर सुरूच झाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्यावर पालकमंत्री सवरा यांनी खासदार अजूनही विरोधी पक्षामध्ये असल्याप्रमाणे वागत आहेत, असा चिमटा काढला. तसेच मतदार संघातील समस्या दिल्लीत मांडा असा सल्लाही त्यांना लगोलग दिला.
महसूल विभागाचा आढावा घेताना खासदारांनी विक्र मगड तहसीलदारांना स्वत:चे वाहन नसताना त्याच्या कार्यालयातील १० जागा रिक्त असल्याचे सांगितले. मोखाडा तहसीलदारांना स्वत:चे वाहन नसून २० जागा रिक्त, पुरवठा अधिकारी नाही, डहाणू तहसीलदारांना स्वत:चे वाहन नसताना १० जागा रिक्त, वसई तालुक्यात नायब तहसीलदार, अव्वल कारकून आदी ४६ जागा रिक्त असल्याची शेकडो रिक्त जागांची जंत्रीच वाचून दाखवली. १२ बालविकास प्रकल्प अधिकाºयांच्या तुलनेत ९ प्रकल्पधिकाºया कडे स्वत:ची वाहने नसून ३ अधीकाºयांकडे असणारी वाहने नादुरु स्त झाली आहेत. हे सर्व अधिकारी कुपोषण निर्मूलन, स्थलांतर, स्वयंरोजगार, धान्य वाटप आदी काम करीत असताना कुपोषण निर्मूलन होणार कसे? असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला.
स्थलांतर रोखण्यासाठी रोजगार हमी योजनेच्या कुशल, अकुशल कामगारांच्या कामापोटी ग्राम सेवकाच्या मागणी वरून ९ कोटी १० लाखाच्या निधीची मागणी आजही पूर्ण करण्यात येत नसल्याची खंत खासदारांनी व्यक्त केली. त्यामुळे स्थलांतर रोखणार कसे? असा प्रश्न उपस्थित केला जात असून दिवंगत खासदार चिंतामण वनगा हे जनतेच्या प्रती आपली बांधिलकी जपत वेळीच आपल्या सरकार विरोधात ही आघाडी उघडायचे. अगदीच तोच कित्ता गावितानी वर्धापन दिनाच्या कार्यक्र म भाषणात गिरवित जिल्ह्यातील अनेक प्रश्न, समस्या सर्वांसमोर मांडीत जिल्ह्याचा विकासासाठी सर्वांनी एकत्र राहण्याचे आवाहन केले.
गावितांच्या फटकेबाजीन पालकमंत्री व्यथित
खासदार गावितांच्या फटकेबाजीने व्यथित झालेल्या पालकमंत्री सवरा यांनी खासदारानी जिल्ह्यातील
रिक्त पदे, निधी, वाहनांची कमतरता, आदी प्रश्न उपस्थित करताना ते विरोधी पक्षात असल्या प्रमाणे वागत असल्याचे सांगून ते सत्ताधाºयांचे खासदार म्हणून निवडून आल्याचे भान ठेवण्याचा सल्ला दिला.
गवितांनी जिल्हा निर्माण केला आणि चालवायला माझ्याकडे दिला त्यामुळे तो मला चालवता आला पाहिजे. मला जिल्हा चालवता येईल की नाही अशी शंका गाविताना आली आणि ते आता माझ्या बरोबरच आहेत. त्यामुळे आपण एकत्र राहिलो तर चांगल्या प्रकारे जिल्हा चालवू असेही शेवटी पालकमंत्र्यांनी सांगितले.