कल्पेश जाधवचे एमपीएससीत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 01:12 AM2018-06-02T01:12:44+5:302018-06-02T01:12:44+5:30

जिल्ह्याच्या जव्हार तालुक्यातील वाळवंडा पैकी खडकीपाड्यातील कल्पेश जाधवने एमपीएससीत मोठे यश मिळविले आहे.

Kalpesh Jadhav's M.Sc. | कल्पेश जाधवचे एमपीएससीत यश

कल्पेश जाधवचे एमपीएससीत यश

googlenewsNext

पालघर : जिल्ह्याच्या जव्हार तालुक्यातील वाळवंडा पैकी खडकीपाड्यातील कल्पेश जाधवने एमपीएससीत मोठे यश मिळविले आहे.
या खडकीपाड्यात रस्त्याची सोय नसून, एसटी बसही जात नाही. या पाड्यात जाण्यासाठी ओहळातून कच्चा रस्ता आहे. आदिवासी पाड्यात राहून शेती करणारे कल्पेशचे निरक्षर आई-वडील तर डोंगरउतारावरील जेमतेम दीड एकर शेती करतात. अशा परिस्थितून दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर कल्पेशने पहिल्याच प्रयत्नात या परीक्षेत यश संपादन केले आहे. या परिक्षेत तो उत्तीर्ण उमेदवारांमधील तो सर्वात कमी वयाचा उमेदवार ठरला. आता तो राज्य शासनाच्या कौशल्या विकास विभागात उपसंचालक म्हणून रु जू होणार आहे. म्हणून त्याच्या या यशामुळे आई वडिलांना व गाववाल्यांना देखील आंनद झाला आहे.
त्याची घरची परिस्थिती तशी अगदी बेताचीच आहे. आई-वडिल दोघेही निरक्षर असून, मोलमजुरी करु न आपला संसार चालवतात. त्यांचा दुसरा मुलगा म्हणजेच कल्पेशचा मोठा भाऊ पोलीस कॉन्स्टेबल आहे.

Web Title: Kalpesh Jadhav's M.Sc.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.