कासाला ५ जानेवारीला महाआरोग्य शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 12:27 AM2018-12-31T00:27:20+5:302018-12-31T00:27:36+5:30

या मेळाव्यात सर्व वयोगटातील नागरीकांची आरोग्य तपासणी व समुपदेशन करण्यात येणार असून अधिकाधिक नागरीकांना तपासणी करून घेण्याचे आवाहन खासदार राजेंद्र गावित यांनी केले आहे.

Kasala on January 5, the great health camp | कासाला ५ जानेवारीला महाआरोग्य शिबिर

कासाला ५ जानेवारीला महाआरोग्य शिबिर

googlenewsNext

पालघर : सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या संयुक्तविद्यमाने येत्या ५ आणि ६ जानेवारी रोजी सकाळी ९ तेसायंकाळी ५ या वेळेत डहाणू तालुक्यातील पूज्य आचार्य भिसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कासा येथ ेमहाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात सर्व वयोगटातील नागरीकांची आरोग्य तपासणी व समुपदेशन करण्यात येणार असून अधिकाधिक नागरीकांना तपासणी करून घेण्याचे आवाहन खासदार राजेंद्र गावित यांनी केले आहे.
यासंबंधी माहिती देण्यासाठी शनिवारी येथेआयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.कांचन वानेरे, जिल्हाआरोग्य अधिकारी डॉ.दयानंद सूर्यवंशी, अतिरिक्त जिल्हाशल्य चिकीत्सक डॉ.केळकर, अधीक्षक डॉ.गावित आदीयावेळी उपस्थित होते.

मोफत दिल्या जाणाऱ्या सेवा सोनोग्राफी, ईसीजी, रक्त तपासणी
सोनोग्राफी, ईसीजी, रक्त लघवी तपासणी, चष्म्याचा नंबर काढणे मिळणे, बीएमडी तपासणी, दिव्यांगांचे युडीआयडी कार्ड, पोषक आहाराविषयी सल्ला,क्षयरोगाच्या निदानाकरीता थुंकीचा नमुना गोळा करणे, एचआयव्ही तपासणी,
कुष्ठरोग तपासणी, मलेरिया विषयीप्रदर्शन व तपासणी, कुटुंब कल्याण व गुप्तरोग विषयक समुपदेशन आदी सेवा या महाआरोग्य मेळाव्यात मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या मेळाव्यात ज्या रूग्णांना शस्त्रक्रियेचीआवश्यकता आहे अशा रूग्णांवर ७ जानेवारी २०१९ रोजीग्रामीण रूग्णालय, पालघर येथे शस्त्रक्रि येची सोय उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच दि. २८ जानेवारी २०१९ रोजी उपजिल्हा रूग्णालय, डहाणू येथेही तसीच सोय करण्यात येईल. ज्या रूग्णांवर क्ष-किरण तपासणी करणेआवश्यक आहे ती उपजिल्हा रूग्णालय कासा येथे करण्यातयेईल. ज्या मुलांना गोवर-रूबेलाची लस दिलेली नाही त्यांना या मेळाव्यात ती दिली जाईल. तर, याच ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन देखील करण्यात येणार आहे. त्यात सगळ्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन आहे.
कोणत्या आजारांवर शस्त्रक्रि या होऊ शकतील : महाआरोग्य मेळाव्यात लहान मुलांमधील हर्निया, अंडवृद्धी, लघवीची निमुळती जागा, पुरूष बिजकोष जन्मत: पोटात असणे व ते बिजकोष शस्त्रक्रि येद्वारे अंडाशयातस्थलांतरीत करणे इत्यादी. तर, प्रौढ माणसांमधील मूळव्याध, हर्निया, अंडवृद्धी, लहान मोठ्या गाठी आदींवर शस्त्रक्रिया होऊ शकणार आहेत. स्त्रियांच्या आजारांमधील शस्त्रक्रि यांमध्ये गर्भाशयाची शस्त्रक्रि या, अंग बाहेर पडणे तसेच स्तनांतील गाठी यांचा समावेश असेल.
उपलब्ध असणारे तज्ज्ञ डॉक्टर्स : या महाआरोग्य मेळाव्यासाठी जिल्ह्यातील तज्ज्ञडॉक्टर्ससह मुंबईतील जे.जे. , ग्रँट वैद्यकीय , वाडिया , हिंदुजा , तेरणा वैद्यकीय या रुग्णालयातील तसेच इंडियन डेंटल असोसिएशन, टाटा ट्रस्ट, येथूनही तज्ज्ञ डॉक्टर्स उपलब्ध होणार आहेत. यामध्ये स्त्री रोग, बालरोग, शल्यचिकीत्सा, अस्थीरोग, संसर्गजन्यरोग चिकीत्सा, नेत्रचिकीत्सा, कान-नाक-घसा, मानसोपचार, त्वचारोग, दंतचिकित्सा, भौतिक उपचार, सिकलसेल, भारतीयवैद्यक शास्त्रातील आयुर्वेदीक, युनानी, होमिओपॅथी आदी विषयांतील तज्ज्ञांचा समावेश असणार आहे. या शिवाय किशोरवयीन मुला-मुलींच्या समस्यांविषयी समुपदेशन देखील करण्यात येणार आहे.

 

 

Web Title: Kasala on January 5, the great health camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य