उमेदवारांच्या खर्चाचा व्यवस्थित हिशोब ठेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 06:31 AM2019-04-01T06:31:17+5:302019-04-01T06:31:29+5:30
निवडणूक खर्च निरीक्षकांचे निर्देश : जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक पूर्वतयारीचा आढावा
अलिबाग : लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चाच्या सर्व बाबी व्यवस्थित नोंदवाव्यात अशी सूचना निवडणूक खर्च निरीक्षक निलांक कुमार यांनी सहायक खर्च निरीक्षकांना दिली. रायगड मतदार संघातील मतदारांच्या मतदान संबंधित काही तक्र ारी असल्यास त्यांनी ९१५८७१९८७६ या क्र मांकावर संपर्क करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
निवडणूक खर्च निरीक्षक निलांक कुमार यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक पूर्वतयारीबाबत आढावा घेतला. या बैठकीस जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, रायगड जि.प.कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने तसेच रायगड लोकसभा मतदार संघातील पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड, दापोली व गुहागर या विधानसभा क्षेत्रासाठी नियुक्त केलेले सहायक खर्च निरीक्षक व जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक कामासंबंधित सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रायगड मतदार संघातील निवडणूकपूर्व तयारीचे संगणकीय सादरीकरण केले.
खर्चविषयक सर्व बाबी समाविष्ट होण्यासाठी काळजी घ्या
खर्च नोंदविण्यापूर्वी संबंधित पथकांनी खर्चविषयक सर्व बाबी समाविष्ट होतील याबाबत काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. सहायक खर्च निरीक्षकांना कामकाज विषयक सूचना किंवा अडचणी असल्यास सांगण्यास सांगितले.