आधार क्रमांक जोडणी नसल्यास केरोसीन बंद
By admin | Published: January 9, 2017 06:19 AM2017-01-09T06:19:41+5:302017-01-09T06:19:41+5:30
आपल्या रेशनकार्डास आधार क्रमांक जोडला आहे का ते पाहून घ्या कारण आधार व मोबाईल क्र मांक सादर न केल्यास त्यांना अनुदानित
विक्रमगड : आपल्या रेशनकार्डास आधार क्रमांक जोडला आहे का ते पाहून घ्या कारण आधार व मोबाईल क्र मांक सादर न केल्यास त्यांना अनुदानित केरोसीन मिळणार नाही असे उपनियंत्रक शिधावाटप संगीता टकले यांनी कळविले आहे. नोंदणी न करणाऱ्यांची रेशनकार्डे रद्द होणारअसून १ फेब्रुवारी २०१७ नंतर जोपर्यंत आधारची माहिती मिळत नाही तोपर्यंत त्यांना केरोसीनचा लाभ घेता येणार नाही. एलपीजी गॅसच्या नव्या ग्राहकांनी देखील आपली माहिती शिधावाटप कार्यालयास द्यावयाची आहे. तसेच ज्यांना रेशनवरील धान्य नाकारायचे आहे. त्यांनी तसे कळवायचे आहे. जे ३१ जानेवारी पूर्वी आधार सीडिंग करून तसे प्रमाणपत्र घेतील त्यांनाच रॉकेल मिळेल. त्यानंतर हा कोटा व्यपगत होईल. व ते मिळणार नाही. (वार्ताहर)