खैराची तस्करी पकडली, चोरटे मात्र झाले फरार
By Admin | Published: March 28, 2017 05:10 AM2017-03-28T05:10:03+5:302017-03-28T05:10:03+5:30
महामार्गावरून लाल रंगाच्या सुमोतून खैराची तस्करी होणार आहे अशी माहिती मिळाल्यामुळे पाळत ठेवून शुक्रवारी रात्री
पारोळ: महामार्गावरून लाल रंगाच्या सुमोतून खैराची तस्करी होणार आहे अशी माहिती मिळाल्यामुळे पाळत ठेवून शुक्रवारी रात्री १२.३०च्या सुमारास तिला अडवून लाखो रुपयांची खैराची तक्सरीची लाकडे जप्त केली. या पथकाने महामार्गावरील भालिवली व खानिवडे येथे पाळत ठेवली होती. त्याप्रमाणे मध्य रात्री १२. ३० च्या सुमारास उड्डाण पुलाच्या खालच्या सर्व्हिस रोडवरून मुंबई कडे जाणाऱ्या व माहितीशी मिळत्या जुळत्या सुमोला गस्त पथकाने अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्या चालकाने गाडीचा वेग अकस्मात वाढवून ती मुंबई दिशेने भरधाव पळवली. यावेळी पाळत ठेवलेल्या पथकाने तिचा पाठलाग केला. तो खानिवडे ते कोपर फाटा (२.५ किमी) येथे निर्माण होत असलेल्या उड्डाण पुलापर्यंत सुरू होता.
ही गाडी काम सुरु असलेल्या पुलाच्या मुंबई वाहिनीच्या उजव्या बाजूकडील मोकळ्या जागेत डिव्हायडरच्या कडेला उभी केलेली आढळली व तस्कर विरुध्द दिशेतील गुजरात वाहिनी पार करून शेजारील शेतात घुसून पळून जातांना दिसले. त्यांचा पाठलाग करतांना शेताचा बांध न दिसल्याने वनरक्षक गिरासे हे जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (वार्ताहर)
यावेळी पाठलाग करताना वनरक्षक गिरासे हे पडले व जखमी झाले. वनकर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतलेली व सोलीव खैराच्या ओंडक्यांनी भरलेली सुमो भालिवली येथील वन क्षेत्रपाल कार्यालयात आणून ती मुद्धेमालसह जप्त करण्यात आली.
याबाबत अधिक तपास वनविभाग करत आहे. आजवर झालेल्या अनेक कारवायांत तस्कर पळून गेले आहेत. मात्र अजूनही त्यांचा अथवा वाहनांच्या मालकांचा थांग पत्ता लागलेला नाही. या बाबत वनाधिकारी चव्हाण यांनी सांगितले की, जप्त केलेल्या वाहनांचे मालक उघड झाले तरी बहुतेक गाड्या या तस्करीच्या आधी चोरीला गेल्याच्या तक्र ारी दाखल होत्या.