खाक जाधव मार्केट पाडून टाकले; नागरिकांची होती मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 11:09 PM2019-06-06T23:09:58+5:302019-06-06T23:10:02+5:30

आजूबाजूच्या इमारतींचा धोका टळला

Khak Jadhav cuts the market; The citizens had the demand | खाक जाधव मार्केट पाडून टाकले; नागरिकांची होती मागणी

खाक जाधव मार्केट पाडून टाकले; नागरिकांची होती मागणी

Next

नालासोपारा : रविवारी (२ जून) पहाटे ५ वाजता नालासोपारा पूर्वेकडील रेल्वेस्टेशन लागूनच तिकीट खिडकीच्या बाजूला असलेल्या जाधव मार्केटला आग लागून २५ दुकाने शॉक सर्किटने जळून खाक झाल्याने दुकानदारांचे मोठे नुकसान झाले होते. ही आग वसई विरार महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाने १ तासाच्या आत विझवली होती. आग विझवल्यानंतर दुकानदारांनी परत दुकान बनविण्याचे काम सुरू केले होते पण बाजूलाच असलेल्या रहीवाशी इमारतीने विरोध दाखवून महानगरपालिकेच्या नालासोपारा कार्यालयात व मुख्यालयात या जाधव मार्केट विरोधात अनिधकृत आणि आम्हाला या जाधव मार्केटमुळे जीवाला धोका असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने गुरु वारी सकाळी महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त दीपक म्हात्रे, अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे कर्मचारी यांनी जेसीबीच्या साहाय्याने ते पाडून टाकले.

Web Title: Khak Jadhav cuts the market; The citizens had the demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.