‘त्या’ तरुणाची हत्या की आत्महत्या?
By Admin | Published: March 18, 2017 03:04 AM2017-03-18T03:04:05+5:302017-03-18T03:04:05+5:30
येथील दोन अल्पवयीन प्रेमी युगुल पळून गेल्याप्रकरणी पालघर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या आशिष काटेला (२१) ह्याने शुक्रवारी सकाळी पालघर स्टेशन
पालघर: येथील दोन अल्पवयीन प्रेमी युगुल पळून गेल्याप्रकरणी पालघर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या आशिष काटेला (२१) ह्याने शुक्रवारी सकाळी पालघर स्टेशन नजीक ट्रेन खाली आत्महत्या केली. ह्या प्रकरणी त्याचा घातपात झाला असून दोषींला अटक करण्याच्या मागणीसाठी त्याचा मृतदेह पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात आला होता.
पालघरच्या लोकमान्य पाडा येथे राहणाऱ्या युगुलानी गुरूवारी आपल्या घरातून लग्न करण्यासाठी पळ काढला. ह्या दोघांना आशिष काटेला ह्यांनी मदत केल्याच्या संशयावरून चौकशीसाठी गुरुवारी रात्री पालघर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मात्र, शुक्रवारी सकाळी मुंबईकडून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या गुजरात एक्स्प्रेस गाडी खाली त्यांनी उडी घेऊन आत्महत्या केली. ह्या प्रकरणी आशिष हा पोलिसांच्या ताब्यात असताना त्याने आत्महत्या कशी केली? असा प्रश्न त्यांच्या नातेवाईकांनी उपस्थित केला असून त्याला पोलीस स्टेशन मधून सोडण्याची माहिती घरच्यांना का देण्यात आली नाही असा प्रश्न नातेवाईकांनी उपस्थित केला आहे.
तो कस्टडीत असताना त्याची सर्वस्वी जबाबदारी पोलिसांची असताना त्याने आत्महत्या केल्याने ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षकांना लिहिलेल्या तक्र ार अर्जात पोलिसांवर संशय व्यक्त केला आहे. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी निमिल गोहेल ह्यांनी चौकशीचे अश्वासन दिले आहे. (प्रतिनिधी)