किसान आक्रोश यात्रा ५ डिसेंबरला, विश्वनाथ पाटील यांचे नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 11:38 PM2018-12-03T23:38:02+5:302018-12-03T23:38:07+5:30

शेतक-यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी नेते विश्वनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य किसान आक्रोश यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

Kisan Awakosh Tour on December 5, Vishwanath Patil's leadership | किसान आक्रोश यात्रा ५ डिसेंबरला, विश्वनाथ पाटील यांचे नेतृत्व

किसान आक्रोश यात्रा ५ डिसेंबरला, विश्वनाथ पाटील यांचे नेतृत्व

Next

वाडा : शेतक-यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी नेते विश्वनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य किसान आक्रोश यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तिचा शुभारंभ ५ डिसेंबर रोजी विक्र मगड येथे होऊन ८ डिसेंबरला पहिल्या टप्प्याचा शेवट मुरबाड येथे होणार आहे. कुणबी सेनेने या आक्रोश यात्रेला पाठिंबा दर्शविला आहे.
५ डिसेंबरला वाडा तालुक्यातील खानिवली येथे सायंकाळी ४ वाजता सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर ६ डिसेंबर रोजी वाडा येथे १० वाजता, कुडूस येथे १२ वाजता, आबिटघर येथे २ तर सोनाळे येथे ५ वाजता सभांचे आयोजन केले आहे. त्यानंतर ७ व ८ डिसेंबर रोजी शहापूर व मुरबाड या तालुक्यांत आक्र ोश यात्रा जाणार असून मुरबाड येथे पहिल्या टप्प्याचा शेवट होणार आहे.
या आक्रोश यात्रेत मोठ्या संख्येने शेतक-यांनी सहभागी व्हावे असे आवाहन कुणबी सेनेचे वाडा तालुका अध्यक्ष प्रल्हाद शिंदे, सरचिटणीस नितीन पाटील यांनी सर्व शेतकऱ्यांना केले आहे.
>आक्र ोश यात्रेच्या मागण्या
संपूर्ण कोकणात दुष्काळ जाहीर करून पंचनामे न करता सरसकट एकरी तीस हजार रु पये नुकसान भरपाई द्या, शेतक-यांना विनाअट संपूर्ण कर्जमाफी द्यावी, धान्य खरेदी केंद्रे सुरू करून भाताला क्विंटल मागे ३५००/- रुपये दर द्या, पिंजाळ व गारगाई या धरणांतील ५० टक्के पाणी पिण्यासाठी व सिंचनासाठी द्या, विविध प्रकल्पांसाठी शेतक-यांच्या जमिन संपादन करताना दलाल, शासकीय अधिका-यांच्या मदतीने शेतक-यांची चाललेली लूट थांबवून थेट व्यवहार करावा. ३५ सेक्शन, वनसंज्ञा, इको सेन्सेटिव्ह झोन इत्यादी जाचक कायदे रद्द करा. दगड, वीट, रेती मातीच्या उत्खननावर घातलेली बंदी उठवा, ओबीसी समाजाला मंजूर
केलेले २७ टक्के आरक्षण मिळालेच पाहिजे, तोट्यात चाललेली भातशेतीची लागवड रोजगार हमी योजनेतून करण्यात यावी. स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करा.

Web Title: Kisan Awakosh Tour on December 5, Vishwanath Patil's leadership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.