म्हात्रे विद्यालयाची किचनशेड कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 06:13 AM2017-07-24T06:13:08+5:302017-07-24T06:13:08+5:30
लगतच्या घराची भिंत कोसळल्याने नरपड येथील अ. ज. म्हात्रे विद्यालयाची किचनशेड आणि संरक्षक भिंत कोसळली. शनिवारी संध्याकाळी
अनिरु द्ध पाटील/ लोकमत न्यूज नेटवर्क
बोडी : लगतच्या घराची भिंत कोसळल्याने नरपड येथील अ. ज. म्हात्रे विद्यालयाची किचनशेड आणि संरक्षक भिंत कोसळली. शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली त्यावेळी शाळा बंद असल्याने मोठा अनर्थ टळला.
शाळेजवळ संजय मनोहर पाटील यांचे घर असून त्यापैकी एका बाजूची भिंत कोसळून अ. ज. म्हात्रे शाळेच्या संरक्षक भिंत आणि किचन शेडवर पडल्याने ते कोसळले. शनिवारी सकाळ सत्रातील शाळा भरवली जाते शिवाय सायंकाळी ही घटना घडली त्यावेळी विद्यार्थी नव्हते. अन्यथा अनर्थ घडला असता. घटनेनंतर संस्थाचालकांनी घटनास्थळी धाव घेतली.
पावसाळ्याचे दिवस असून मोडकळीस आलेल्या इमारती पडण्याच्या घटना घडतात. दरम्यान तालुक्यातील दुरावस्था झालेल्या शाळा इमारती तसेच शाळेलगत मोडकळीस आलेल्या इमारतींची तत्काळ पाहणी करून त्या जमीनदोस्त करणे आवश्यक आहे. अन्यथा निष्पापांचे बळी जाण्याचा धोका आहे. डहाणू पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तसेच शिक्षणाधिकारी लाचखोरीच्या आरोपाखाली निलंबित आहेत. त्यामुळे धोकादायक इमारतींचा संवेदनशील विषय हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी शिक्षक आणि पालक व नागरिकांकडून करण्यात येत आहे.