वसईत सनसिटी मैदानावर पतंग महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 05:26 AM2019-01-10T05:26:54+5:302019-01-10T05:27:14+5:30

संक्रांतीचे खास आकर्षण : मोदींच्या बुलेट ट्रेनचा पतंग अवघ्या सात रुपयाला

Kite Festival on Vasaiat Suncity Maidan | वसईत सनसिटी मैदानावर पतंग महोत्सव

वसईत सनसिटी मैदानावर पतंग महोत्सव

Next

वसई : येथील सनसिटी मैदानावर यंग स्टार ट्रस्ट तर्फे रविवारी १३ जानेवारीला पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
मकर संक्र ांतीच्या दिवसाची वाट खरतर पतंगबाजीची मौज लुटण्यासाठी सर्वाधिक पाहिली जाते. पतंग उडवण्यापेक्षा पेंच लढवण्याची मजा काही औरच असते. यानिमित्त शौकिनांसाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. आमदार हितेंद्र ठाकूर अध्यक्ष असलेल्या यंग स्टार ट्रस्ट विरार यांच्यावतीने तसेच गुजराती परिवार व वसई जेष्ठ नागरीक संघ यांच्या सहकार्याने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. दुपारी ३ वाजल्यापासून या महोत्सवास सुरूवात होणार आहे. यावेळी आकर्षक बक्षिसे विजेत्यांना देण्यात येणार आहेत. अभिनव पतंग व पेच लढविणाऱ्यांना विशेष बक्षिसे दिली जाणार आहेत.

मकरसंक्र ांत जवळ आल्याने सध्या सर्वत्र पतंगांची धूम दिसत आहे. वेगवेगळे पतंग बाजारात विक्र ीसाठी दाखल झाले असून पाच रूपयांपासून ते तीनशे रूपयांपर्यंतचे पतंग बाजारात उपलब्ध आहेत. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छबी असलेल्या मोदिंजीकी बुलेट ट्रेन व किप इंडिया क्लिन या नावाचे पतंग मोठ्या प्रमाणात विक्र ीसाठी आलेले आहेत. या पतंगांची किंमत सात रूपये आहे. पतंग विक्री करणारेही मोदी की बुलेट ट्रेन सात रूपये मे असे ओरडून ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. १५० रूपयांपासून ७०० रु पयांपर्यंत मांजा भरलेल्या फिरक्याही विक्री करण्यासाठी उपलब्ध आहेत. पतंगाची मोठी बाजारपेठ असलेल्या अहमदाबाद येथून आठवडाभर आगोदर पतंग विक्र ीसाठी आणत असल्याचे वसई पूर्व वाघरीपाडा येथील गोपाळ या पतंग विक्रेत्याने सांगितले. या विक्रीतून लाखोंची उलाढाल होते.
वसईत ठिकठिकाणी पतंगविक्र ीचे स्टॉल लागले आहेत. त्यात विविध पतंग पहायला मिळत आहेत. दोन, पाच रूपयांपासून ते अडीचशे, तीनशे रूपयांपर्यंतचे पतंग असून ते घेण्यासाठी गर्दी होत आहेत. वेगवेगळ्या आकार, रंगांमध्ये तसेच स्टाईलमध्ये पतंग आहेत. हिरॉईन्सचे फोटो असलेले, संदेश असलेले पतंगही दिसत असून १० ते ५० रूपयांपर्यंतच्या पंतंगांना जास्त मागणी आहे. तर महागडे पतंग काही ठराविक लोकच विकत घेत आहेत. अनेक लोक रात्रीच्या वेळेस पतंगांना छोटे कंदील बांधून ते आकाशात उडवतात. असे छोटे कंदीलही विक्री होत आहेत. पतंगांची विक्र ी मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्यावर विक्र ेत्यांना या सीझनमध्ये मोठा फायदा होतो. पतंग उडविण्याची स्पर्धा आत्तापासूनच लागली आहे.

पतंगाचा मांजा घेतोय पक्षांचा जीव.
च्एकीकडे बच्चे कंपनी, तरूणाई पतंग उडवून काटाकाटीच्या तयारीत आहेत तर मांजामुळे पक्षी जखमी होत असल्याने प्राणी मित्रांनी पतंग उडवू नये, याबाबत जनजागृती चालवली आहे.
च्पतंग उडवितांना मांज्यामुळे पक्षी जखमी होतात. निष्पाप प्राण्यांचे जीवही त्यात जातात. त्यामुळे गेले तीन-चार वर्ष वसई पट्ट्यात मकरसंक्र ांतींचे दोन दिवस जखमी पक्षांवर उपचार करण्यासाठी शिबीर ठेवले जाते. पक्षांवर दया करा, असे सांगणारे एसएमएस आत्तापासून पाठवले जात आहेत.

पतंग आणि लाडूंची आॅनलाइन खरेदी.
होलसेल बाजारात उपलब्ध असणाºया पतंग आणि फिरक्यांपेक्षा आॅनलाइन वेबसाइटसवर त्यांच्या किमती अधिक आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे. पतंगदोरी, डी कॅथलॉन, अमेझॉन, हायफाय काईट्स या साइटसवर पतंगोत्सव भरला आहे. दिवाळीत विविध पदार्थांचे जसे आॅनलाइन शॉपिंग झाले तसेच मकर संक्रांतीसाठी तिळाचे लाडू आणि तिळाच्या वड्या आॅनलाइन शॉपिंग साइटसवर उपलब्ध आहेत.
 

Web Title: Kite Festival on Vasaiat Suncity Maidan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.