पतंगबाजी बेतली जीवावर; पाचवर्षीय मुलाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 10:36 PM2020-01-16T22:36:07+5:302020-01-16T22:37:11+5:30

तंग उडवीत असताना झालेल्या बाचाबाचीचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या शेजाºयाला उचलून आपटून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी आरोपी रवींद्र नाईक (२९, रा.खाणपाडा) याला पोलिसांनी अटक केली आहे.

Kite flying A five-year-old boy dies in a water tank | पतंगबाजी बेतली जीवावर; पाचवर्षीय मुलाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू

पतंगबाजी बेतली जीवावर; पाचवर्षीय मुलाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू

Next

नालासोपारा : पूर्वेकडील परिसरात राहणाऱ्या एका पाच वर्षांच्या चिमुकल्या मुलाचा पतंग पकडण्यासाठी गेला असताना बाजूलाच एका निर्माणाधीन इमारतीच्या उघड्या पाण्याच्या टाकीत पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. तुळींज पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री त्याचा मृतदेह सापडल्यानंतर अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

नालासोपारा पूर्वेकडील आचोळे डोंगरी येथील एकता कॉलनीमधील सदनिका नं.२ मध्ये चंडालिया कुटुंब राहते. त्यांचा एकुलता एक पाच वर्षांचा मुलगा वंश विकास चंडालिया हा बुधवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घराबाहेर खेळत असताना मकरसंक्रांत सण असल्याने पतंग पकडण्यासाठी गेला होता. पण तो घरी परतलाच नाही. घरच्यांनी व नातेवाईकांनी आजूबाजूला शोध घेतला असता तो मिळून न आल्याने तुळींज पोलीस ठाण्यात जाऊन अपहरणाची तक्रार देत गुन्हा दाखल केला होता. मात्र एकता कॉलनीच्या जवळच एका निर्माणधीन इमारतीच्या पाण्याच्या उघड्या टाकीत मुलाची एक चप्पल दिसल्यावर टाकीत शोध घेण्यात आला. अखेर रात्री उशिरा त्याचा मृतदेह सापडला. बांधकाम व्यावसायिकाने पाण्याच्या टाकीवर झाकण ठेवले असते किंवा सुरक्षारक्षक ठेवला असता तर या पाच वर्षांच्या चिमुकल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला नसता, अशी चर्चा परिसरात सुरू होती. या घटनेनंतर चंडालिया कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

शेजाºयाला आपटून ठार करण्याचा प्रयत्न
पालघर : पतंग उडवीत असताना झालेल्या बाचाबाचीचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या शेजाºयाला उचलून आपटून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी आरोपी रवींद्र नाईक (२९, रा.खाणपाडा) याला पोलिसांनी अटक केली आहे. सदर आरोपीवर सातपाटी सागरी पोलीस स्थानकात एका उद्योगपतीची लूट केल्या प्रकरणीही गुन्हा नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस सूत्रांनुसार बुधवारी मकरसंक्रांतीच्या दिवशी दुपारी पालघरमधील खाणपाडा येथे या प्रकरणातील मारहाणीत अत्यवस्थ असलेला नरेश वेडगा (२५) हा आपल्या काही नातेवाईक, मित्रमंडळींसोबत पतंग उडवीत असताना आरोपी आपल्या मोटारसायकलीवर बसून तेथून जात होता. या वेळी मोटरसायकलीमध्ये मांजा अडकल्या प्रकरणावरून दोघात बाचाबाची झाली.

आरोपीने नरेश याला या वेळी उचलून काँक्रीटच्या रस्त्यावर आपटले. यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला प्रथम पालघर ग्रामीण रुग्णालयात, नंतर सिल्वासामधील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डोक्यात रक्तस्त्राव झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी सुरत येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे, असे सपोनि. संदीप कहाळे यांनी सांगितले.

Web Title: Kite flying A five-year-old boy dies in a water tank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kiteपतंग