कोसबाड कृषी विज्ञान केंद्रास पुरस्कार; संचालक जाधव यांनी स्वीकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 12:01 AM2018-09-08T00:01:37+5:302018-09-08T00:01:56+5:30

गोखले एज्युकेशन सोसायटीचा सर्वोत्तम संस्था पुरस्कार कोसबाडच्या कृषी विज्ञान केंद्रास विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते परळ येथील आर. एम. भट हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवानिमित्त प्रदान करण्यात आला.

 Kosbad Agricultural Science Center Award; Director Jadhav accepted | कोसबाड कृषी विज्ञान केंद्रास पुरस्कार; संचालक जाधव यांनी स्वीकारला

कोसबाड कृषी विज्ञान केंद्रास पुरस्कार; संचालक जाधव यांनी स्वीकारला

Next

बोर्डी : गोखले एज्युकेशन सोसायटीचा सर्वोत्तम संस्था पुरस्कार कोसबाडच्या कृषी विज्ञान केंद्रास विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते परळ येथील आर. एम. भट हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवानिमित्त प्रदान करण्यात आला. या केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ विलास जाधव यांनी तो स्वीकारला.
मागील बेचाळीस वर्षांपासून ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांच्या उन्नतीकरीता या केंद्राने कृषी विषयक विविध उपक्रमांचे आयोजन केले. त्यामुळे शेती उत्पादन वाढून त्यांचा राहणीमानाचा स्तर उंचावला. या योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी व्यासपीठावर गोखले एज्युकेशन सोसायटीचे व्हाईस चेअरमन डॉ. आर. जे. गुजराथी, सचिव सर डॉ. मो. स. गोसावी, गुरु दक्षिणा माजी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा प्रतिमा जोशी, विभागीय सचिव डॉ. सुवासिनी संत, डॉ. राम कुलकर्णी उपस्थित होते. हा पुरस्कार मिळण्यासाठी गोखले एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन प्रि. एस. बी. पंडित, विभागीय सचिव प्रिं. प्रभाकर राऊत यांच्यासह डाँ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डाँ संजय भावे तसेच आयसीएआर अटारी पुणे येथील येथील संचालक डॉ. लखन सिंग यांचे मार्गदर्शन मिळाल्याचे विलास जाधव म्हणाले.

१४० केंद्रांतून झाली निवड
आंतरराष्ट्रीय दर्जा असलेली गोखले एज्युकेशन सोसायटी या नामांकित संस्थेमार्फत शिक्षण व ग्रामीण विकास क्षेत्रात भरीव योगदान देणाº्या संस्थांना हा पुरस्कार देण्यात येतो. सोसायटीच्या १४० केंद्रामधून कोसबाडच्या कृषी विज्ञान केंद्राची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यामुळे हा पुरस्कार मिळाल्याबद्दल केंद्राचे प्रमुख सर्व शास्त्रज्ञ व कर्मचार्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Web Title:  Kosbad Agricultural Science Center Award; Director Jadhav accepted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.