कुडूस-गौरापूरचा रस्ता दर्जाहीन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 03:06 AM2018-03-17T03:06:36+5:302018-03-17T03:06:36+5:30
सर्वाधिक वर्दळीचा असणारा कुडूस-चिंचघर-गौरापूर या रस्त्याचे काम कासवाच्या गतीने सुरू असून या कामात नियमानुसार साहित्य वापरले जात नसल्याने रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप कुणबी सेनेने केला आहे.
- वसंत भोईर
वाडा : तालुक्यातील सर्वाधिक वर्दळीचा असणारा कुडूस-चिंचघर-गौरापूर या रस्त्याचे काम कासवाच्या गतीने सुरू असून या कामात नियमानुसार साहित्य वापरले जात नसल्याने रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप कुणबी सेनेने केला आहे. अत्यंत महत्वाच्या सध्या व वाहतूक कोंंडी च्या बनलेल्या या रस्त्याचे बोगस काम कारणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी एका निवेदनाव्दारे तहसिलदार दिनेश कुºहाडे यांच्याकडे करण्यात आली आहे. या प्रकरणी चालढकल झाल्याच २० मार्च रोजी तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
कुडूस-चिंचघर-गौरापूर हा १२ किमी लांबीचा रस्ता असून त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ९ कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून हे काम सांगले कंस्ट्रक्शन नाशिक यांना देण्यात आले आहे. परंतु या ठेकेदार एजन्सीने हे काम वाडयातील दोन सब ठेकेदारांन दिले आहे. त्यातून कुडूस ते चिंचघर पर्यंतचा रस्ता क्राँक्रीटकरण तर चिंचघर ते गौरापूर पर्यंतचा रस्ता डांबरीकरण होणार आहे.
ते काम सध्या सुरू असून त्यासाठी वापरले जाणारे साहित्य हे निकृष्ट दर्जाचे असल्याचा कुणबी सेनेच्या पदाधिकाºयांचा आरोप आहे. या रस्त्यावर लॅब असणे आवश्यक आहे. ती कुठेच दिसत नाही. मुरूम चाळण्या घेतल्या जात नाहीत. मोºयांसाठी वापरले जाणाºया पाईपाला दोन्ही बाजुंनी केसिंग करून पाईप टाकला पाहिजे परंतु तसे होत नाही. त्यामुळे रस्त्यावर दाब आल्यावर पाईप फूटण्याची शक्यता आहे.
पाईप अंथरण्यापूर्वी क्राँक्रीट झाले पाहिजे ते ठरलेल्या जाडीचे होत नाही. जे खडीकरण केले आहे ते बरोबर दाबले गेले नसल्याने रस्ता उखडला जात आहे. झालेल्या मोºयांवर कुठेही पाणी मारलेले दिसत नाही. ओल्या कामांवर गोणपाट अंथरणे आवश्यक आहे. मात्र या ठिकाणी ते दिसत नाही. गिरीट पावडर वापराला निर्बंध असतांना खुलेआम गिरीट पाववडर वापरली जात आहे. एकंदर अंदाज पत्रकानुसार काम केले जात नसल्याचा आरोप कुणबी सेनेने केला आहे.
हर्षद गंधे म्हणतात, काम अपूर्ण मात्र दर्जा उत्तम
या संदर्भात ठेकेदार हर्षद गंधे यांच्यासाठी संपर्क साधला असता कामाचा दर्जा उत्तम असून अजून काम पूर्णच झाले नसल्याने दर्जा बाबत प्रश्नच उपस्थित केला जाऊ शकत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर स्थापत्य सहाय्यक अभियंता पृथ्वीराज जगदाळे यांच्याशी संपर्क साधला असता या कामाला नागरिकांच्या विरोधामुळे विलंब होत आहे. मात्र, काम नियमाप्रमाणे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
>कोंढला-खैर रस्त्याचे : साडेचार कोटी पाण्यात
याच ठेकेदाराने कोंढला-खैरे या रस्त्याचे काम मे महिन्यात केले होते तो रस्ता जून मध्ये पूर्णपणे उखडला गेल्याने शासनाचे ४ कोटी ३५ लाख पाण्यात गेले आहेत. ते ही काम पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील होते. त्याकामात शाखा अभियंता विनोद घोलप हे पार्टनर असल्याचे बोलले जात होते. याही कामात ते ठेकेदारांसोबत असल्याने याही रस्त्याचा पूरता बोजवारा उडाला आहे. या प्रकरणी उपोषण करण्याचा इशारा कुणबी सेनेचे उपतालुका प्रमुख प्रदिप हरड यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. त्याच्या प्रती अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, जिल्हाधिकारी यांना माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.