कुडूस पाणी योजना रखडली

By admin | Published: June 15, 2016 12:36 AM2016-06-15T00:36:37+5:302016-06-15T00:36:37+5:30

कुडूस हे बाजारपेठेचे गाव असून वाढत्या लोकसंख्येनुसार मंजूर झालेल्या नवीन पाणी योजनेचे काम तिच्या जलकुंभ आणि जलशुद्धिकरण केंद्रासाठी जागा मिळत नसल्याने सहा महिन्यांपासून

Kudus water scheme stopped | कुडूस पाणी योजना रखडली

कुडूस पाणी योजना रखडली

Next

वाडा : कुडूस हे बाजारपेठेचे गाव असून वाढत्या लोकसंख्येनुसार मंजूर झालेल्या नवीन पाणी योजनेचे काम तिच्या जलकुंभ आणि जलशुद्धिकरण केंद्रासाठी जागा मिळत नसल्याने सहा महिन्यांपासून ठप्प झाले आहे. त्यामुळे पाण्यासाठी आणखी काही काळ कुडूस वासीयांना वाट पाहावी लागेल.
कुडूस परिसरात डी प्लस झोनमुळे अनेक कारखाने आले आहेत. कारखानदारांमुळे येथील लोकसंख्या झपाटयÞाने वाढत आहे. गेल्या काही वर्षांत कुडूस गावासह पाच ते सहा उपनगरे वाढली. सतत वस्ती वाढत आहे. आजमितीस ३० ते ३५ हजारांच्या आसपास लोकवस्ती आहे. चिंचघर - कुडूस येथे मोठयÞा शैक्षणिक संस्था असल्याने परिसरातील नागरिक आपल्या मुलांच्या भवितव्यांच्या दृष्टीने ते येथेच वस्ती करतात. या कारणामुळे कुडूसची जुनी पाणी योजना अपुरी पडत होती. उपनगरांना पाणी पुरवठा न झाल्याने येथील नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्याची दखल घेऊन तत्कालीन सरपंच कुमार जाबर व उपसरपंच मिलींद चौधरी यांनी प्रयत्न करून ५ कोटी रु पये किंमतीची नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर करून घेतली. तिचे भूमिपूजन मोठा गाजावाजा करून तत्कालीन ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते. १८ जानेवारी २०१४ रोजी या योजनेचे काम सुरू करण्यात आले असून त्यासाठी दोन वर्षांचा कालावधी देण्यात आला होता. मात्र गेल्या सहा महिन्यापासून पाण्याची टाकी व जल शुध्दीकरण केंद्रासाठी जागाच उपलब्ध होत नसल्याने या योजनेचे काम बंद आहे. त्यामुळे पाण्यासाठी कुडूसवासीयांना आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे. (वार्ताहर)

गेल्या अनेक महिन्यापासून मी ग्रामपंचायत प्रशासना कडे पत्रव्यवहार करून पाण्याची टाकी व जलशुध्दीकरण केंद्रासाठी जागेची मागणी केली आहे. मात्र ती न मिळाल्याने हे काम बंद आहे. उर्वरित ६५ टक्के काम झाले असून फक्त ३५ टक्केच काम बाकी आहे. जागा मिळाल्यास तत्काळ काम सुरू करू .
- संदेश जी. बुटाला, ठेकेदार

या योजनेच्या कामात भ्रष्टाचार झाला असून काम कमी केले असून जास्त पैसे काढले आहेत. त्यामुळे तत्कालीन सरपंच कुमार जाबर यांना आयुक्तांनी निलंबित केले आहेत.
- मिलिंद चौधरी, प्रभारी सरपंच, ग्रामपंचायत कुडूस

Web Title: Kudus water scheme stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.