तारापूर औद्योगिक क्षेत्रात लेबर युनियनने काढली संकल्पयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 02:49 AM2018-05-02T02:49:13+5:302018-05-02T02:49:13+5:30
कामगार दीना निमित्त तारापूर औद्योगिक क्षेत्रात मंगळवारी मुंबई लेबर युनियनच्यावतीने कामगार संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले
बोईसर : कामगार दीना निमित्त तारापूर औद्योगिक क्षेत्रात मंगळवारी मुंबई लेबर युनियनच्यावतीने कामगार संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले होते . ही संकल्प यात्रा तारापूर एम आय डी सी नाक्यावरु न टाटा स्टील जवळील गोगटे नाक्या पर्यंत काढण्यात आली होती. यावेळ जमलेल्या शेकडो कामगारांनी कामगार एक तेच्या घोषणा दिल्या.
कामगारांना किमान १८ हजार रुपये वेतन मिळायला पाहिजे, कंत्राटी कामगारांचे १२ तासाचे काम बंद करा, सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार कंत्राटी कामगारांना समान वेतन श्रेणी लागू करा, कामगार विमा योजनेची सुविधा लवकरात लवकर लागू करा, कामगार कायदे पायदळी तुडवणाऱ्या उद्योजकांना व कंत्राटदारांना जेलमध्ये टाका, नियमित (कायम) कामगारांची नोकरी सुरिक्षत ठेवण्यात आली पाहिजे, कायम कामगारांना मिळत असलेल्या सर्व सोई सुविधा या कंत्राटी कामगारांनाही मिळायलाच पाहिजेत आदी मागण्या संकल्प यात्रेत करण्यात आल्या.
या वेळी मुंबई लेबर युनियनचे जनरल सेक्र ेटरी संजीव पुजारी, सेक्र ेटरी सुशील नायक, व्हाईस प्रेसिडेंट संजय शिंदे युनियनचे पदाधिकारी हरजल सिमोन, अमित मुरु डकर, पत्रकार रामप्रकाश निराला यांचे सह कामगार प्रतिनिधी व कामगार सहभागी झाले होत.े गोगटे नाक्यावर कामगारांची सभा घेण्यात आली.