महिलांच्या पुढाकाराने दारूबंदी
By admin | Published: March 10, 2017 03:33 AM2017-03-10T03:33:38+5:302017-03-10T03:33:38+5:30
हाताला काम नाही, शिक्षणाचा आभाव आणि त्यातून आलेले नैराश्य घालवण्यासाठी तालुक्यातील शेकडो खेड्या पाड्यात चालणारे दारुचे गुथ्थे, हे चित्र येथील २८ गावपाड्यातील
मोखाडा: हाताला काम नाही, शिक्षणाचा आभाव आणि त्यातून आलेले नैराश्य घालवण्यासाठी तालुक्यातील शेकडो खेड्या पाड्यात चालणारे दारुचे गुथ्थे, हे चित्र येथील २८ गावपाड्यातील महिलांनी बदलले असून पोलीस दादांच्या मदतीने शंभर टक्के दारुबंदी केली आहे.
तालुक्यातील चप्पलपाडा, मंडक्याचीमेट, धोंडमर्याचीमेट सूर्यमाला, किनिस्ते, वाकडपाडा, करोळ, पाचघर, आडोशी, कळमवाडी, खोच, चास, आसे, धामणी, करोळी, बेरीसत्य,े तोरणरशेत, पोशेरा, चारणवाडी, वखारीचापाडा, निळमाती, गोंदे, हिरवे, शेरीचा पाडा, पिपळपाडा, घोसाळी, भोयाचा पाडा अश्या २८ गावपाड्यामध्ये महिलांनी पुढाकार घेऊन दारू बंद केली आहे. गेल्या दीड वर्षाच्यापासून सुरु असलेल्या या चळवळीने शंभर टक्के दारुबंदी करुन मोठे पाऊल उचलले आहे. (वार्ताहर)
मोखाडा तालुक्यात दारूबंदी करण्याचा माझा प्रयत्न आहे. दारूबंदी जनजागृतीसाठी बैठका घेऊन गावपाडे पिंजून काढले आहेत. महिलांना सर्वतोपरी पाठिबा दिल्याने चळवळ प्रभावी ठरत आहे.
- डी. पी. भोये,
पोलीस निरीक्षक मोखाडा