वसईच्या किल्ल्यात लैला मजनूंचा उच्छाद
By admin | Published: February 15, 2017 04:26 AM2017-02-15T04:26:39+5:302017-02-15T04:26:39+5:30
वसईच्या ऐतिहासिक किल्ल्यात सध्या दारुडे आणि प्रेमीयुगुलांनी उच्छाद मांडला आहे. त्यांच्यामुळे एका ऐतिहासिक वास्तूचे पावित्र्य
वसई : वसईच्या ऐतिहासिक किल्ल्यात सध्या दारुडे आणि प्रेमीयुगुलांनी उच्छाद मांडला आहे. त्यांच्यामुळे एका ऐतिहासिक वास्तूचे पावित्र्य धोक्यात आले असून त्याला आळा घालण्याचे आवाहन किल्ले वसई मोहिमच्या वतीने पोलीस आणि कस्टम अधिकाऱ्यांना करण्यात आले .
वसई किल्ल्यात पुरातत्व विभागाने महत्वाच्या वास्तूंची डागडुजी केल्याने दुर्गमित्रांना अभ्यास करण्याची मोठी सोय झाली आहे. मात्र, सध्या किल्लयात दारुड्यांनी उच्छाद मांडला आहे. रात्री उशिरा दारुड्यांचा याठिकाणी अड्डा असतो. त्यावर कळस म्हणजे प्रेमीयुगुलांच्या खुलेआम चाळ्यांमुळे याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांनाही त्रास होऊ लागला आहे, अशी तक्रार किल्ले वसई मोहिमचे श्रीदत्त राऊत यांनी केली आहे. ते सागरी दरवाजाने आत शिरणाऱ्यांना पोलीस आणि कस्टम अधिकाऱ्यांनी रोखावे, अशी मागणी राऊत यांनी केली आहे. (प्रतिनिधी)