वनाधिकाऱ्याच्या खाजगी वाहनात दिवा, कारवाई होणार का?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 03:03 AM2018-12-27T03:03:49+5:302018-12-27T03:04:46+5:30
केंद्रसरकारने लाल दिव्याची संस्कृती संपुष्टात आणली तरी अजूनही पिवळ्या रंगाच्या दिव्याची संस्कृती कायम आहे. मंत्री अथवा अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या वाहनावर लावले जाणारे लाल दिवे जसे बाजारात सहज उपलब्ध होत होते.
डहाणू/बोर्डी : केंद्रसरकारने लाल दिव्याची संस्कृती संपुष्टात आणली तरी अजूनही पिवळ्या रंगाच्या दिव्याची संस्कृती कायम आहे. मंत्री अथवा अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या वाहनावर लावले जाणारे लाल दिवे जसे बाजारात सहज उपलब्ध होत होते. तसेच हे पिवळ्या रंगाचे दिवे देखील कुणालाही उपलब्ध होत आहे. त्यावर ना पोलिसांचे ना आरटीओचे नियंत्रण आहे. संसदेवर हल्ला करणा-या पाच दहशतवाद्यांनी असाच लाल दिवा आपल्या गाडीवर लावून संसद परिसरात घुसखोरी केली होती. हा अनुभव असतांनाही या दिव्यांच्या सहज उपलब्धतेला कुठलेही निर्बंध लावण्यात आलेले नाही. याचा प्रत्यय डहाणू वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर उभ्या असलेल्या एका खाजगी वाहनाचे हे छायाचित्र पाहिले की येतो. पांढर्या रंगाचे हे खाजगी वाहन सोमवारी, २४ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास उभे होते. त्यामध्ये चालकाच्या सीट समोर, बाहेरून दिसेल अशा पद्धतीने पिवळा अंबरदिवा ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे असा दिवा वापरण्याचा कोणताही अधिकार हे वाहन वापरणाºया अधिकाºयाला नसतांना हे घडले होते.
हे खाजगी वाहन वाडा संशोधन केंद्राच्या उत्तम शिंदे यांचे आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांची डहाणू वनपरिक्षेत्रातून बदली झाली आहे. मात्र वरिष्ठांच्या परवानगीने ते या कार्यालयाच्या आवारातील निवास्थानी राहत आहेत.
या बाबतची माहिती मिळविल्यानंतर चौकाशी करण्यात येईल.
- अमितकुमार मिश्रा,
उपवन संरक्षक, जव्हार