आरक्षित जागेवर भूमाफियांचा कब्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 11:31 PM2020-02-20T23:31:29+5:302020-02-20T23:31:36+5:30
नागरिक त्रस्त : कचराभूमीसाठी राखीव जागेवर बेकायदा चाळी उभारण्याचा घाट
विरार : कचराभूमीसाठी आरक्षित जमीन भूमाफियांनी काबीज केल्याचा प्रकार वसईत समोर आला आहे. या जमिनीवर आता बेकायदेशीररीत्या चाळी उभारल्या जात आहेत. त्यामुळे आधीच शहरात कचराभूमीच्या जागेची टंचाई भासत असताना आरक्षित जागेवर असे प्रकार सुरु असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
वसई पूर्वेच्या राजिवली भागात सर्व्हेे क्रमांक ११५ ची जमीन कचरा भूमीसाठी आरक्षित आहे. पालिकेने अद्याप ही जागा कचराभूमीसाठी तयार केलेली नाही. मात्र हा भूखंड आता भूमाफियांनी आपल्या कब्जात घेतलेला दिसतो. या जमिनीवर बिल्डरांनी माती टाकून चाळ बांधण्याचे काम हाती घेतले आहे. महापालिकेकडे वसईच्या गोखीवरे येथे एकच कचराभूमी आहे. ती जागाही अपुरी पडत असल्याने पालिकेला टंचाई भेडसावत आहे. त्यामुळे महापालिकेकडे राजिवली भागात कचराभूमीची आरक्षित जागा असतानाही तेथे भूमाफियाकडून बेकायदेशीर चाळी का उभारतात, असा असा उपस्थित होत आहे. महापालिका बिल्डरांवर कारवाई का करत नाही, असा प्रश्न नागरीक करत आहेत.
महापालिकेकडून आतापर्यत दोनदा सदर बांधकामावर तोडक कारवाई करण्यात आली आहे. मात्र तरीही बिल्डर कचरा भूमीच्या जागेवर अतिक्र मण करत आहेत. लवकरच त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
-सुरेंद्र पाटील, सहाय्यक आयुक्त,
वसई-विरार महापालिका
डम्पिंग ग्राउंडवर होत असलेल्या अनधिकृत बांधकामासबंधित प्रकरणावर पालिका अधिकाऱ्याला तक्रारीचे पत्र दिले आहे. जर कारवाई न झाल्यास संबधित अधिकाºयाला निलंबित करण्याची मागणी करणार आहोत.
-रमेश घोरकाना,
स्थानिक नगरसेवक