वाडावासीयांची सोन्यासारखी जमीन होणार मातीमोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 12:29 AM2020-11-25T00:29:34+5:302020-11-25T00:29:45+5:30
जनआंदोलनाचा इशारा : २२० के.व्ही. अतिउच्च दाबाच्या विद्युत वाहिनीस शेतकऱ्यांचा विरोध
वाडा : तारापूर-बोरीवली आणि बोईसर-घोडबंदर लीलो ते कुडूस अशी २२० केव्ही अतिउच्च दाबाची विद्युत वाहिनी जात असून या वाहिनीत अनेक शेतकऱ्यांची जमीन जात असल्याने शेतकरी बाधित होणार आहेत. या वाहिनीमुळे घरे, गुरांचे गोठे उद्ध्वस्त होणार आहेत तसेच जमिनीचे मूल्यही घसरणार आहे.
सोन्यासारखी जमीन मातीमोल होणार असल्याने तालुक्यातील चांबळे, डाकिवली या गावांतील शेतकऱ्यांनी या वाहिनीस तीव्र विरोध दर्शवला असून जनआंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांचे नुकसान करण्याऐवजी वनविभागाच्या जागेतून ही वाहिनी न्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महापारेषणने केलेल्या सर्वेक्षणानुसार ही अतिउच्च दाबाची विद्युतवाहिनी जात
आहे. शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. - भरत चौगुले, महापारेषण अधिकारी