जमीन खरेदी विक्री ठप्प
By admin | Published: January 25, 2017 04:32 AM2017-01-25T04:32:58+5:302017-01-25T04:32:58+5:30
जमीन खरेदी विक्री व्यवहार व त्यासाठी लागणारे सातबारा उतारे शासनाने १५ मार्चपासून आॅनलाईन केले असले तरी ते सहज उपलब्ध होत नसल्यामुळे हे व्यवहार ठप्प
विक्रमगड : जमीन खरेदी विक्री व्यवहार व त्यासाठी लागणारे सातबारा उतारे शासनाने १५ मार्चपासून आॅनलाईन केले असले तरी ते सहज उपलब्ध होत नसल्यामुळे हे व्यवहार ठप्प झाले आहेत गेल्या तीन महिन्यात अवघे १०४ दस्त नोंदविले गेले असून या स्थितीला नोटाबंदीचाही हातभार लागला आहे.
यापूर्वी दस्त नोंदणीची गती आणि संख्या खूप मोठी होती. ती ठप्प झाल्याने सरकारला मोठ महसूलालाही मुकावे लागले आहे. शिवाय जमीन खरेदीदार व विक्रेता यांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे़ परंतु विक्रमगड व परिसरात अजूनही आॅनलाईनची कामे पूर्ण झालेली नसल्याने नागरिकांना ७/१२ मिळण्यास अडचण निर्माण होत आहे़ तसेच नविन नोंदणी,फेरफार टाकण्यासही कालावधी लागत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होेत आहे़ शासन नियमानुसार १५ दिवसांत फेरफार टाकून खरेदीदारांची नांवे ७/१२ वर दाखल होणे आवश्यक आहे मात्र सध्या तशी परिस्थीती नसल्याने मोठी अडचण निर्माण होेत आहे़त्यामुळे जमीनीचे व्यवहार थंडावले आहेत़ त्यामुळे नागरिकांनी या कामांसाठी थांबायचे तरी किती तलाठी,मंडळअधिकारी नुसते वायदे व आश्वासने देत असल्याने जनता हैराण झाली आहे़ अनेकांनी जमीनी विकत घेऊन फेरफार नोंदणीची तसेच वारस नोंदणीची प्रकरणी सादर केली आहेत़ परंतु गेल्या तीन महिन्यांपासून ती कामे रखडल्याने शेतकरी, व्यापारी, आणि गरजुंनी मोठी कोंडी झाली आहे़ आॅनलाईन सातबा-याची कामे पूर्ण झाले नसल्याने आधी ती पूर्ण करुन मगच तो व्यवहारासाठी जोडण्याचा व त्याचा उपयोग करण्याची सक्ती करावी तोपर्यत मॅन्युअल (हस्तलिखित) ७/१२ व्यवहारासाठी चालवावा अशी मागणी जार धरु लागली आहे़ (वार्ताहर)