आदिवासींची जमीन ठेकेदाराने लाटली, दुर्वेस ग्रा.पं.तील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 05:59 AM2018-04-07T05:59:39+5:302018-04-07T05:59:39+5:30
दुर्वेस गावातील आदिवासींच्या नावे असणाऱ्या नवीन शर्त जमिनीमध्ये अतिक्रमण करुन बांधकाम करणाºया ठेकेदाराला ग्रामपंचायतीने नोटीस देऊनही तिस त्याने के राची टोपली दाखविली आहे.
- आरिफ पटेल
मनोर - येथील दुर्वेस गावातील आदिवासींच्या नावे असणाऱ्या नवीन शर्त जमिनीमध्ये अतिक्रमण करुन बांधकाम करणाºया ठेकेदाराला ग्रामपंचायतीने नोटीस देऊनही तिस त्याने के राची टोपली दाखविली आहे. संबधित बांधकामाला महसूल खात्याचीही परवानगी नसल्याने व जमिन मालकांचा विरोध असल्याने त्यावर कारवाईची मागणी होत आहे.
राकेश मिश्रा या ठेकेदाराने दुर्वेस ग्रामपंचायतीच्या हद्दीतील या जमिनीवर अतिक्रमण करुन आपली दादागिरी चालविली असल्याची तक्रार संतोष रामा पाडोस व सोन्या लाडका डावरे यांनी दुर्वेस ग्रामपंचायतीकडे केली आहे. मौजे दुर्वेस येथील गट क्रंमाक १३०/२ क्षेत्र १-०-१ हे आर जमिनीत ग्रामपंचायतीची व महसूल विभागाची परवानगी न घेता भिंतीचे कुंपण टाकून त्या आत एका शेडची उभारणी केली आहे.
विशेष म्हणजे जमिन मालक असणाºया आदिवासी कुटुंबियाना ठेकेदार संबधित जागेमध्ये प्रवेश करु देत नाही. त्या बाबत दुवैस ग्रामपंचायतीने त्यास नोटीस बजावली असून कारवाईचा इशारा दिला आहे. मात्र ठेकेदार मिश्राने त्यास धुप घातलेली नाही. सदरची नोटीस न स्विकारुन त्याने स्वत: जवळची कागदपत्रे सुद्धा दाखविलेली नाहीत. लोकमतने मिश्रा यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, त्या संदर्भात या गरीब आदिवासींनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाद मागितली आहे.
रात्रीस खेळ चाले...
ठेकेदाराच्या दांडगायी विरोधात मुळ मालकांनी ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय (सजा) व मंडल अधिकारी कार्यालयाकडे तक्रार केल्यानंतर त्या जागेवरील बांधकाम बंद पाडण्यात आले आहे. मात्र, ठेकेदार मिश्रा हा रात्री ते काम पुर्णत्वास नेत असल्याने पेचप्रसंग निर्माण झाला आहे. त्यासंदर्भामध्ये प्रविण सांबरे यांनी मंडल अधिकाºयांना तक्रार केली आहे.
नवीन करार म्हणजे काय?
ही जमिन आदिवासी व्यक्तीला शासनाकडून शेतीसाठी दिलेली आहे. त्यास नवीन शर्त संबोधले जात असून मुळ मालकाच्या परवानगीने शासनाला तिची किंमत देऊन कागदोपत्री ती नावे करण्याची प्रोसेस पुर्ण करावी लागते.
हे सोपस्कर पार पाडल्यानंतर ती जुन्या शर्तमध्ये परावर्तित होते. दरम्यान, नविन शर्त जमिनीवर कोणतेही बांधकाम करता येत नाही.
सदर जमिन नवीन शर्तीतील असल्यास व तिची जुन्या शर्तीमध्ये रुपांतर झाले नसल्यास. महसून प्रशासन कारवाई करुन ती ताब्यात घेईल.
- नवनाथ झरे, निवासी उपजिल्हाधिकारी (पालघर)