पालघरमधील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 12:58 AM2020-08-08T00:58:44+5:302020-08-08T00:59:35+5:30

पीक विमा योजना : तक्रार ७२ तासांत करण्याची सुविधा उपलब्ध

Large losses to farmers in Palghar due to heavy rains | पालघरमधील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान

पालघरमधील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान

Next

बोर्डी : पालघर जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्या शेतकºयांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे, त्यांचे पावसामुळे नुकसान झाले असल्यास त्यांनी टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन शासनातर्फे करण्यात आले आहे. याकरिता पीडित शेतकºयाला ७२ तासांच्या कालावधीत नुकसानग्रस्त क्षेत्र आणि विमा भरल्याचा पुरावा मेल करायचा आहे.

कृषी विभागामार्फत शेतकºयांना याबाबत माहिती दिली जात आहे. जिल्ह्याच्या आठ तालुक्यांतील २८ मंडळांत ३० हजार ३११ शेतकºयांनी १४७६९.८५ हेक्टर क्षेत्रावर ६४ कोटी ५३ लाख ४१ हजार ६८१ रकमेचा भात, तूर आणि नागली पिकाकरिता पीक विमा काढला असून त्यामध्ये सर्वात अधिक भात पिकाचे क्षेत्र आहे. शेतकºयांचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होऊ नये याकरिता प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे. मागील काही वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी त्याचा लाभ घेत आहेत. हवामान विभागाने उत्तर कोकणात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचे पूर्वानुमान दिल्यानुसार ३ आॅगस्टपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे काही भागात नदी, ओहळ आणि नाले या लगतच्या भात खाचरातील पिकांचे नुकसान झाले आहे. भात पीक विमा योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकºयांचे नुकसान झाले असल्यास त्यांनी ७२ तासांच्या आत टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविण्याचे आवाहन शासनाने केले आहे. याकरिता शेतकºयांचे पूर्ण नाव, पिकाचे नाव, शेत जमिनीचा सर्व्हे नंबर, पीक विमा अर्ज क्रमांक किंवा विमा भरल्याचा पुरावा आदी कागदपत्रे जोडून स्रोु८.ेंँं१ं२ँ३१ं@ ँािूी१ॅङ्म.ूङ्मे या ई-मेलवर पाठविण्यास सांगितले आहे.
जिल्ह्याच्या आठ तालुक्यांतील २८ मंडळात शेतकºयांनी ३१ जुलै या अंतिम तारखेपर्यंत भात, तूर आणि नागली या पिकांकरिता ३० हजार ३११ शेतकºयांनी १४७६९.८५ हेक्टर क्षेत्रावर प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेतला आहे. तर सर्व्हर डाऊन झाल्याने अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले होते. डहाणू तालुक्यातील चिंचणी, डहाणू, कासा, मल्याण, सायवन येथील ५ हजार ४५० शेतकºयांनी विम्याचे कवच घेतले आहे. त्यामध्ये १०३२ कर्ज घेतलेले आणि ४,४१८ बिगरकर्जदार शेतकरी आहेत. त्यापैकी १९८८ शेतकºयांनी बँकेत तसेच ३,४६२ सरल सेवा केंद्रातून अर्ज भरले असून २६३४.५७ हेक्टरकरिता एकूण ११ कोटी ९७ लाख ७१ हजार ३४९ एवढी विमा रक्कम आहे. जव्हार तालुक्यातील ९७४ शेतकºयांकडून ३७६.७३ हेक्टरवर १ कोटी १२ लाख १ हजार २७५ रकमेची विमा रक्कम आहे. मोखाडा तालुक्यातील ८२१ शेतकºयांनी ४४९.८४ हेक्टरवरील ९६ लाख ९६ हजार २६७ विमा रक्कम आहे. तर पालघर तालुक्यातील ५ हजार ५६३ शेतकºयांनी २३६२.६० हेक्टरकरिता १० कोटी ७४ लाख ९८ हजार ७९ विमा रक्कम आहे. तलासरी तालुक्यातील २ हजार ८४७ शेतकºयांनी ४ कोटी ९२ लाख ६९ हजार ८४८ विमा रक्कम आहे. वाडा तालुक्यातील चार मंडळांतल्या ९ हजार ७२२ शेतकºयांनी ५१६१.५० हेक्टर क्षेत्रावर २३ कोटी ४३ लाख ८ हजार ७७८ रक्कम आहे. वसईतल्या ३६६ शेतकºयांनी ९४ लाख ६० हजार ८७ रकमेचा विमा उतरवला आहे. तर विक्रमगड तालुक्यातील ४ हजार ५६८ शेतकºयांनी १० कोटी ४१ लाख ३५ हजार ९९८ रकमेचा विमा उतरविण्यात आला आहे.
 

Web Title: Large losses to farmers in Palghar due to heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.