मोखाड्यातील नळपाणी योजनांना अखेरची घरघर
By admin | Published: February 17, 2017 12:11 AM2017-02-17T00:11:25+5:302017-02-17T00:11:25+5:30
तालुक्याची पाणीसमस्या सुटावी, यासाठी २८ गावपाड्यात शासनाने राबविलेल्या नळपाणी योजनांपैकी खोडाळा आणि मोखाडा
मोखाडा : तालुक्याची पाणीसमस्या सुटावी, यासाठी २८ गावपाड्यात शासनाने राबविलेल्या नळपाणी योजनांपैकी खोडाळा आणि मोखाडा वगळता अन्य सर्वच पाणीयोजना बंद आहेत काही ठिकाणी वीजबिला अभावी तर काही ठिकाणी दुरुस्ती अभावी या योजनांना अखेरची घरघर आली आहे.
दरवर्षी पाणी टंचाईची समस्या उग्र रूप धारण करत असूनही प्रशासन मात्र याकडे गंभीरतेने बघत नाही. तालुक्यातील पाणी टंचाईची समस्या दरवर्षी प्रमाणे यंदाही डोके वर काढत आहे़ प्रशासनाची उदासिनता आणि शून्य नियोजनामुळे येथील आदिवासींची घोटभर पाण्यासाठी होणारी पायपीट थांबलेली नाही. पाण्याचे कायमस्वरूपी स्त्रोत आहे की नाही याची खातरजमा न करता योजना राबविल्या तर काही ठिकाणी वीजेची बिलेच भरलेली नाहीत. (वार्ताहर)