कायद्याच्या विद्यार्थ्यांनी अनुभवले थेट सर्वोच्च न्यायालयातील कामकाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 11:01 PM2020-01-13T23:01:31+5:302020-01-13T23:01:40+5:30

सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचा उपक्रम : अन्य महत्त्वाच्या संस्था आणि विभागांनाही भेट

The law students experienced directly the affairs of the Supreme Court | कायद्याच्या विद्यार्थ्यांनी अनुभवले थेट सर्वोच्च न्यायालयातील कामकाज

कायद्याच्या विद्यार्थ्यांनी अनुभवले थेट सर्वोच्च न्यायालयातील कामकाज

Next

हितेन नाईक

पालघर : सर्वोच्च न्यायालय या देशातील प्रमुख न्यायालयातील कामकाज पाहणे, अनुभवणे हा कायदा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा अनुभव. ्रपालघरमधील सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यास दौऱ्यांतर्गत नुकतीच सर्वोच्च न्यायालयाला भेट दिली. याचबरोबर देशातील अत्यंत महत्त्वाच्या संस्था आणि विभागांचे कामकाजही अनुभवले. या विशेष अभ्यास दौºयाचे आयोजन सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पायल चोलेरा व प्रा. अ‍ॅड. विनोद गुप्ता यांनी केले होते. या अभ्यास दौºयात महाविद्यालयाच्या ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयाने कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी ४ ते ११ जानेवारी दरम्यान एका विशेष अभ्यास दौºयाचे आयोजन केले होते. जालियनवाला बागेतील ऐतिहासिक घटनेच्या स्मारकाला वंदन करून या विद्यार्थ्यांच्या दौºयाला सुरुवात झाली. त्यानंतर भारत - पाक अटारी सीमेवर भारतीय लष्करामार्फत आयोजित विविध कार्यक्रमांमधे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सर्वोच्च न्यायालयातील प्रत्यक्ष कामकाज अनुभवणे हे या दौºयाचे मुख्य उद्दिष्ट असल्याने ऐतिहासिक वास्तू, कोर्ट रूम, न्यायदान प्रक्रिया, वाचनालय, बार रुम याबाबत सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना समजावून सांगितली.

सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनचे सेक्रेटरी आणि लेखक अ‍ॅड. अशोक अरोरा यांनी विद्यार्थ्यांची भेट घेत सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. अभ्यास दौºयात पुढे राष्ट्रीय हरित न्यायालयातील कामकाज आणि कार्यपद्धतीबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

त्याचप्रमाणे लॉ ट्रिब्युनल येथे प्रत्यक्ष जाऊन कामकाज पाहणे, कार्यपद्धती समजून घेणे तसेच तज्ज्ञांमार्फत आयोजित कार्यशाळेत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. सामाजिक क्षेत्रात काम करणाºया वर्ल्ड वाईल्डलाईफ फंड, यु.एन अशा विविध आंतरराष्ट्रीय संस्थांनाही विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या. भारताचे नियत्रंक आणि महालेखापाल (उअॠ) या स्वायत्त संस्थेचे कामकाज, कार्यपद्धती आणि संरचना याबाबत विशेष व्याख्यानाचे आयोजन केले होते.

Web Title: The law students experienced directly the affairs of the Supreme Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.