खंडणी प्रकरणात वकील सहआरोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:18 AM2018-04-29T00:18:39+5:302018-04-29T00:18:39+5:30

माहिती अधिकार कायद्याच्या वापरातून खंडणीखोरी करणाऱ्यांविरोधात वसईत सुरु असलेल्या मोहिमेत राजिकय नेते, माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्या पाठोपाठ काही पत्रकारांवरही गुन्हे दाखल झाले आहेत

Lawyers co-accused in ransom case | खंडणी प्रकरणात वकील सहआरोपी

खंडणी प्रकरणात वकील सहआरोपी

googlenewsNext

पारोळ : माहिती अधिकार कायद्याच्या वापरातून खंडणीखोरी करणाऱ्यांविरोधात वसईत सुरु असलेल्या मोहिमेत राजिकय नेते, माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्या पाठोपाठ काही पत्रकारांवरही गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणात आता वसईतील नामांकित वकील, तथा बार असोसिएशन आॅफ वसईचे अध्यक्ष अ‍ॅड. नोएल डाबरे यांना सहआरोपी केल्याने वसईत खळबळ उडाली आहे.
वसईतील संजय कदम याच्यावर माहिती अधिकार कायद्याचा गैरवापर करून बांधकाम व्यावसायिकांकडून खंडणी मागितल्याचे दोन गुन्हे वसई पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. ३१ मार्च रोजी वसईतील बांधकाम व्यावयासिक खालिद शेख याचेकडून संजय कदम याने साडेपाच लाख रु पयांची खंडणी मागितल्याची तक्र ार दिल्यानंतर कदम विरोधात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात कदम फरार होता. मात्र अचानक वसई पोलिसांनी या गुन्ह्यात कदम याचे साथीदार म्हणून डाबरे आणि चव्हाण यांना सहआरोपी दाखवले आहे.

समाजात स्वच्छ प्रतिमा असलेल्या वकिलांना सहआरोपी करताना पोलीसांनी कोणतीही शहानिशा वा पुराव्यांची खातरजमा केली नसल्याचे, तसेच या कारवाईचा आम्ही निषेध करीत असल्याचे वकील संघटनेच्या पदाधिकाºयांनी म्हटले असून अ‍ॅड. डाबरे आणि त्यांच्या सहकारी वकिलावर आकस आणि सूडबुध्दीने ही तक्रार दाखल करण्यात आली असून निष्पक्ष चौकशी करून न्याय देण्याची मागणी एका ठरावाद्वारे बार असोसिएनशने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. दरम्यान, अ‍ॅड. डाबरे अणि अ‍ॅड. चव्हाण यांनी वसई न्यायालयातून या प्रकरणात अटकेविरोधात अंतरिम अटकपूर्व जामिन मिळवला आहे.

Web Title: Lawyers co-accused in ransom case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.