बोनस सोडा, ३ महिने कंत्राटींना पगार नाही
By Admin | Published: October 26, 2016 05:19 AM2016-10-26T05:19:06+5:302016-10-26T05:19:06+5:30
कोकण विभागाच्या प्रादेशिक संचालकांनी महावितरण मध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना बोनस देण्याचे आदेश दिले असतांना त्यांना मागील तीन महिन्यापासून पगारच
पालघर : कोकण विभागाच्या प्रादेशिक संचालकांनी महावितरण मध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना बोनस देण्याचे आदेश दिले असतांना त्यांना मागील तीन महिन्यापासून पगारच मिळालेला नसल्याने त्यांच्या कुटुंबाची दिवाळी अंधारात साजरी होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आज भारतीय मजदूर संघ संलग्न महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्यावतीने पालघरच्या विद्युत वितरण कार्यालया समोर आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मध्ये कंत्राटी कामगार भरण्याची प्रक्रि या करणाऱ्या अधिकाऱ्यांनी वेळीच टेंडर प्रक्रि या पूर्ण न केल्याने तसेच कंत्राटदारानेही कंत्राटी कामगारांना हि आॅर्डर नसल्याने कामावर जाऊ नका, असे सांगून पगाराची हमी घेण्याचे टाळले होते. अशा वेळी विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटी कामगारांना कामावर बोलावणे, पगार दिला जाईल असे ठोस आश्वासन दिले जाईल असे सांगितले होते. त्या मुळे कामावर हजर झालेल्या कंत्राटी कामगारांनी एप्रिल २०१६ पासून ते जून २०१६ पर्यंत असे तीन महिने काम करूनही त्यांना एक छदामही मिळालेला नाही. सध्या ५२ कंत्राटी कामगारांचे प्रत्येकी ६ हजार ५०० रु पये प्रमाणे १० लाख १४ हजारची रक्कम जमा होत असून ज्या अधिकाऱ्यांनी कंत्राटी कामगारा कडून कामे करवून घेतली त्यांच्या कडूनच हि रक्कम वसूल करण्यात यावी अशी मागणी कामगार संघाचे पालघर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत नेवे यांनी सांगितले. त्यामुळे ऐन दिवाळी च्या तोंडावर पगार मिळत नसल्याने कंत्राटी कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात असून त्यांनी आज पासून विद्युत वितरण पालघर कार्यालयाच्या समोर आंदोलन सुरू केले आहे.(वार्ताहर)