निवासी इमारतीत हॉटेल सुरू करण्याचा डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 12:12 AM2019-12-19T00:12:55+5:302019-12-19T00:13:01+5:30
भिवंडीतील प्रकार : नागरिकांच्या तक्र ारींकडे पालिकेचे दुर्लक्ष
भिवंडी : निवासी इमारतीत गाळ्याच्या वर असलेल्या सदनिकेला आतून भगदाड पाडून तेथे हॉटेल सुरू करण्याचा घाट एका व्यावसायिकाने घातला असून याप्रकरणी इमारतीतील रहिवाशांनी पालिका प्रशासनाकडे तक्र ारी केल्या. मात्र, प्रभाग अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे बेकायदा हॉटेलचे काम पूर्ण होत आले आहे. विशेष म्हणजे या हॉटेलमालकाने ही तोडफोड केल्याने इमारतीची सुरक्षितताही धोक्यात आली आहे. त्यामुळे पालिकेच्या या कारभाराविरोधात रहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
भिवंडीतील कासारआळी येथील नझराना कम्पाउंड येथे दत्तछाया ही निवासी इमारत असून या इमारतीच्या तळमजल्यावर गाळे बांधण्यात आले आहेत. पहिल्या व दुसºया मजल्यांवर सदनिका आहेत.
या इमारतीच्या तळ मजल्यावर मनोज अग्रवाल पानवाला यांचा गाळा असून या गाळ्याच्या वर सदनिका क्र मांक १०२ आहे. ही सदनिका पूनम गुप्ता यांच्या नावे आहे. मात्र, त्यांच्याकडून अग्रवाल यांनी ती घेऊन आपल्या तळमजल्यावरील गाळ्यातून जिना करून या सदनिकेत हॉटेल सुरू करण्याचा घाट घातला आहे. विशेष म्हणजे या निवासी सदनिकेची हॉटेलसाठी मोठ्या प्रमाणात बेकायदा तोडफोड केली असल्याने या इमारतीची सुरक्षितता धोक्यात आली आहे.
निवासी इमारतीत अशा प्रकारे विनापरवाना हॉटेल चालविण्याची तरतूद नसून या हॉटेलमालकाने पालिकेच्या नगररचना विभागाची तशी रीतसर परवानगीही घेतली नसल्याची बाब इमारतीतील रहिवासी दीपक पाटील, जयेंद्र भोईर, विलास कटरे, ललित शर्मा, जगन्नाथ भगत यांनी पालिका प्रशासनाच्या वेळोवेळी निदर्शनास आणून दिली आहे. यासंदर्भातील लेखी तक्रारही पालिकेकडे दिली आहे.
मात्र, प्रभाग समिती-५ चे प्रभाग अधिकारी सोमनाथ सोष्टे यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला असता त्यांच्याकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
...तर निश्चितच कारवाई केली जाईल
यासंदर्भात तक्र ार प्राप्त झाली असून संबंधित हॉटेलमालकास दुरुस्तीसंदर्भात व हॉटेल सुरू करण्यासाठी या कार्यालयाकडून कोणतीही परवानगी देण्यात आली नाही किंबहुना तशा प्रकारे निवासी इमारतीत हॉटेल सुरू करता येत नाही. संबंधित हॉटेलमालकाने जर इमारतीच्या मूळ ढाच्यात बेकायदा बदल केला असेल, तर संबंधितावर निश्चितच कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रि या प्रभाग अधिकारी सोमनाथ सोष्टे यांनी दिली आहे.