पाय गमाविले पण अनेकांना वाचविले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 02:24 AM2018-08-15T02:24:49+5:302018-08-15T02:25:14+5:30
शौर्य फक्त लष्करातीलच जवान गाजवतात असा साधारण समज असतो परंतु अलीकडच्या काळात युध्द होण्याच प्रमाण कमी झाले आहे आणि देशांतर्गत दहशतवाद, नक्षलवाद वाढला आहे. त्यामुळे लष्करी जवानांपेक्षा अंतर्गत सुरक्षा राखणाऱ्या दलांच्या जवानांना तळहातावर शीर घेऊन लढण्याची वेळ अधिक येत असते.
शौर्य फक्त लष्करातीलच जवान गाजवतात असा साधारण समज असतो परंतु अलीकडच्या काळात युध्द होण्याच प्रमाण कमी झाले आहे आणि देशांतर्गत दहशतवाद, नक्षलवाद वाढला आहे. त्यामुळे लष्करी जवानांपेक्षा अंतर्गत सुरक्षा राखणाऱ्या दलांच्या जवानांना तळहातावर शीर घेऊन लढण्याची वेळ अधिक येत असते. रामदासांच्या बाबतीतही असेच झाले. छत्तीसगडमधील नक्षलवादग्रस्त सुकमा जिल्हयातील पाडोली जंगलात ते सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स चे पोलीस म्हणून गस्त घालत होते. त्यांच्या समवेत २६ पोलीस होते. परंतु आघाडीवर रामदास होते, २९ नोव्हेंबर २०१७ रोजी ते गस्त घालत असतांना अचानक त्यांचा पाय लक्षलवाद्यांनी पेरलेल्या फूट बाँम्बवर पडला आणि त्यांच्या दोनही पायांच्या चिंधडया उडाल्या. या परिसरात असंख्य फूट बॉम्ब पेरलेले असू शकतात मागून येणाºया आपल्या सहकाºयांना सावध करायला हवे, हा एकच विचार त्यांच्या मनात स्वत: मृत्यू समोर असतांनाही होता. मरणप्राय यातना होत असतांनाही त्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी आपल्या सहकाºयांना सावध केले आणि त्यांचे प्राण वाचविले. नंतर या परिसराला बॉम्ब मुक्त करून त्यांना स्ट्रेचरवर आणून उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले गेले. ८ महिने उपचार घेतल्यानंतर ते बरे झाले पण त्यांना कृत्रीम पाय बसवावे लागले. चालण्यासाठी काठीचा आधार कायमचा घ्यावा लागला. त्यांच्या या जखमी होण्याचे वृत्त गावात कळाले तेव्हा ते लवकर आणि सुखरूप बरे व्हावे यासाठी गावाने प्रार्थना केली. त्यांच्या कुटुंबात पत्नी, २ मुलं, आई, वडील असे सदस्य आहेत. ते गावी पोहचले तेव्हा ग्रामस्थांनी त्यांचे भावपूर्ण स्वागत केले.
शब्दांकन - हुसेन मेमन
देशासाठी मी माझे पाय अर्पण केले. मला मी माझे पाय गमावले याचे दु:ख नाही परंतु माझ्या सहकाºयांचे प्राण मी वाचविले याचा अभिमान आहे. - रामदास भोगाडे