रोहयो मजुरांना कष्टाची अल्प मजुरी
By admin | Published: September 9, 2016 02:43 AM2016-09-09T02:43:29+5:302016-09-09T02:43:29+5:30
तालुक्यातील बेहेडगांव येथील मजुरांनी सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत रोहयो मजुरांनी, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमीवर रस्त्याच्या कामात काम अधिक करूनही केलेल्या कामाची मजुरी
जव्हार : तालुक्यातील बेहेडगांव येथील मजुरांनी सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत रोहयो मजुरांनी, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमीवर रस्त्याच्या कामात काम अधिक करूनही केलेल्या कामाची मजुरी अल्प मिळाल्यान मजुरांनी सां. बा. विभागावर खापर फोडत संताप व्याक्त केला असून चौकशीची मागणी केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी अंतर्गत सायवन ते घोडीपाडा, बेहेडगांव या रस्त्याच्या कामावर, घोडीपाडया जवळ बेहेडगांव येथील १८१ रोहयो मजुरांची मे महिन्यात रोजगार हमीवर २ ई- मस्टरे काढून कामे केली आहेत. या रस्त्याच्या साईट पट्टीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे.
महाराष्ट्र रोजगार हमीवर काम करणाऱ्या रोहयो मजुराला- १८१ रु पये दिवसभराची मजुरी देणे बंधनकारक आहे. रस्त्याचे काम मजुरांच्या अंगावर असल्याने मजुराला त्या मजुरीपेक्षा अधिक मजुरी मिळायला हवी होती. मात्र, रस्त्याच्या साईट पट्टीच्या कामावर मजुराला दिवसभर काम करूनही फक्त ७० ते ८० रुपये दिवसभराची मजुरी मिळाली आहे. त्यामुळे बेहेडगांव येथील रोहयो मजुरांनी एवढे काम करूनही अल्प मजुरी मिळाल्याने सां. बा. विभागावर मजुरांनी नाराजी व्यक्त करीत चौकशीची मागणी केली आहे.
रोजगार हमीवरील कामाचे ई- मस्टर काढून मजुरांनी केलेल्या कामाची मजुरी बँकेत किवा पोस्टामध्ये दिली जाते. त्यामुळे सां. बा. विभागाच्या अधिकाऱ्यांनी हात झटकत या मजुरांनी जेवढे काम केले आह तेवढीच मजुरी या मजुरांना मिळाली आहे अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे या सायवन, घोडीपाडया जवळ बेहेडपाडा येथील मजुरांनी रस्त्याच्या साईट पट्टीच्या केलेल्या कामाचे माप घेऊन मजुरी देण्यात यावी. विशेष म्हणजे काही मजुरांना मिळालेल्या कामाच्या मजुरीत त्रुटी आढळल्या आहेत यामध्ये काहींना ६० रु पये रोज तर काहींना १२० रु पये रोजंदारी असा फरक आहे. काम तर सारखेच केले आहे त्यामुळे कमी मजुरी मिळालेल्या मजुरांनी नाराजी व्याक्त करीत चौकशीची मागणी केली आहे. (वार्ताहर)