ट्रॅक्टरच्या जमान्यात शेतकऱ्यांची नांगराकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 02:52 AM2018-07-14T02:52:47+5:302018-07-14T02:53:16+5:30

पावसाळा आला म्हणजे ग्रामिण भागात डोळ्यासमोर उभी राहते हिरवीगार शेती. शेतात पेरणी, चिखलणीसाठी चालणारे नांगर आणि त्यांना हाकणाºयांचा घुमणारा आवाज. सोबतच नांगर ओढणारी बैलांची जोडी.

 Lessons to the farmers of the tractor | ट्रॅक्टरच्या जमान्यात शेतकऱ्यांची नांगराकडे पाठ

ट्रॅक्टरच्या जमान्यात शेतकऱ्यांची नांगराकडे पाठ

googlenewsNext

कासा - पावसाळा आला म्हणजे ग्रामिण भागात डोळ्यासमोर उभी राहते हिरवीगार शेती. शेतात पेरणी, चिखलणीसाठी चालणारे नांगर आणि त्यांना हाकणाºयांचा घुमणारा आवाज. सोबतच नांगर ओढणारी बैलांची जोडी. मात्र, आजच्या आधुनिक काळात ही बैलांची नागरणीही थांबली असून त्याऐवजी शेतकरी ‘पॉवर टिलर’ वापराकडे वळतात दिसत आहेत.
पूर्वी शेतकरी म्हटला म्हणजे त्यांच्याकडे असणारी डौलदार बैलांची जोडी, लाकडी नांगराच्या एक दोन जोड्या आणि बैलगाडी असे चित्र असे. एकदा जून महिना उजाडला की, शेतकरी जमीन मशागतीसाठी नांगर दुरुस्ती करणे, नवीन नांगर तयार
करणे, एखादा बैल कमी असल्यास बैल शोधणे, नवीन बैल खरेदी करणे किंवा भाड्याने बैल आणणे, नांगरणी व चिखलणीसाठी लागणाºया फळीसाठी मजबूत लाकूड शोधणे अशा कामांची शेतकºयांची लगबग सुरू होत असे.
ग्रामिण भागातील शेतकरी आता मशागतीच्या कामासाठी पॉवर टिलर वापरु लागला आहे. लाकडी नांगराऐवजी पॉवर टिलरचा वापर केल्याने शेतकºयांचा वेळ, पैसा तसेच शारिरीक श्रमही वाचतात. साधारणपणे पॉवर टिलर दोन तासात एक हेक्टर जमीन नांगरतो. त्यामुळे नांगराच्या तुलनेत कमीत कमी वेळात जास्त जमीन नांगरली जात असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.
पूर्वीच्या काळी शेतकरी लावणी, नांगरणी, पेरणी आदी कामे एकमेकांच्या शेतात जाऊन मदत करत असत. परंतु आता मजुरांची टंचाई व पावसाचा अनियमतिपणा त्यामुळे प्रत्येक शेतकरी आपल्या परीने आपली शेतीची कामे पेरणी, रोपणी लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करतात. पॉवर टिलर भाड्याने घेणाºया शेतकºयांना ३०० रु प्रति तास या भावाने पैसे मोजावे लागतात. त्यामुळे बरेच शेतकरी शेतीच्या कामासाठी लाकडी नांगराऐवजी लवकरात लवकर काम पूर्ण करण्यासाठी पॉवर टिलर वापरत आहेत. या आधुनिकिते मुळे शेतकरी फायद्यामध्ये असून त्याचे श्रमही वाचत आहेत.

आधुनिकता परवडणारी

सध्या बाजारात एका बैलजोडीची किंमत ३० ते ४० हजारावर पोहचली आहे. त्यातच वर्षभर बैलांची राखण करणे, त्यांना खाद्य पुरविणे आदी न परवडणाºया बाबी शेतकºयांना कराव्या लागतात. मात्र, पॉवर टिलर व ट्रॅक्टर खरेदीसाठी शेतकºयांना व महिला बचत गटांना ३५ ते ५० टक्के अनुदान शासनाकडून मिळते त्यामुळे ते पॉवर टिलर कडे वळताना दिसत आहे.

Web Title:  Lessons to the farmers of the tractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.