बोर्डीतील विद्यार्थिनींना सुरक्षिततेचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 10:38 PM2018-12-13T22:38:24+5:302018-12-13T22:38:49+5:30

स्पर्श, सवांदाच्या अर्थाची दिली माहिती; जाणीव ट्रस्टच्या माध्यातून अभियानाचे आयोजन

Lessons of safety on Board students | बोर्डीतील विद्यार्थिनींना सुरक्षिततेचे धडे

बोर्डीतील विद्यार्थिनींना सुरक्षिततेचे धडे

Next

- अनिरुद्ध पाटील

डहाणू : जाणीव चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सुपेह विद्यालयातील आणि व. का. लाखणी माध्यमिक विद्यालयातील अशा एकूण ९१० विद्यार्थिनींना आत्मभान जागृत करून स्व-संरक्षण करणारे मार्गदर्शनपर व्याख्यान मिलिंद पोंक्षे आणि शिर्वरी कलगुटकर यांनी दिले. या कार्यक्र माचे आयोजन महिला दक्षता समिती घोलवड, स्फूर्ती महिला क्लब बोर्डी आणि मराठी विज्ञान परिषद बोर्डीच्यावतीने करण्यात आले होते.

विरार येथे घडलेल्या एका दुर्दैवी घटनेतून जाणीव ही ट्रस्ट साकारण्यात आली. सार्वजनिक तसेच घरगुती पातळीवर मुलींना लैंगिक अत्याचार आणि वाईट नजरेचा सामना करावा लागतो. त्यामुळे असुरक्षिततेची भावना निर्माण होते. या करिता १२ ते १८ वयोगटातील विद्यार्थिंनिना चांगले व वाईट ओळखणे. स्पर्श तसेच प्रलोभन, व्यसन, आकर्षण याबद्दलचे आत्मभान जागृत करून स्व:त्वाची ओळख पटविण्याबाबतचे मार्गदर्शन या ट्रस्टच्यावतीने येथील ४६४ व्या व्याख्यानातून देण्यात आले. यावेळी आचार्य भिसे विद्यानगरीतील सुपेह विद्यालयाच्या ५५० आणि बोरिगाव येथील लाखणी शाळेतील ३६० विद्यार्थिनींनी त्याचा लाभ घेतला. दरम्यान, ग्रामीण भाग असल्याने पालक अज्ञानी आहेत, या विषयावर ते पाल्याशी बोलतातच असं नाही, त्यामुळे येथील विद्यार्थींनीना अशा मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता असल्याचे लाखाणी शाळेच्या मुख्याध्यापिका दीपा पाटील म्हणाल्या. तर समाजातील वाईट प्रवृत्तीवर मात करण्याचे भान शालेय वयापासून मुलींना आल्यास, भविष्यात असुरिक्षततेचे भयचक्र भेदण्याचे बळ त्यांच्यात निर्माण व्हावे या उद्देशाने व्याख्यान आयोजित केल्याचे मराठी विज्ञान मंडळाच्या अध्यक्षा उर्मिला करमरकर यांनी सांगितले.

Web Title: Lessons of safety on Board students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.