विद्यार्थिनींना स्व संरक्षणाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 10:51 PM2018-12-11T22:51:24+5:302018-12-11T22:52:00+5:30
आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून जानेवारी २०१७ पासून देशभरात ‘मिशन साहसी ’ हा उपक्रम राबविला जात आहे.
तलासरी : आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून जानेवारी २०१७ पासून देशभरात ‘मिशन साहसी ’ हा उपक्रम राबविला जात आहे. यात विद्यार्थिनींना स्व: सरक्षणाचे प्रशिक्षण देऊन त्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याच धर्तीवर शनिवारी तलासरी येथे विद्यार्थींना प्रशिक्षण देण्याच्या कार्यक्र म घेण्यात आला. यात शहरातील विविध सहा महाविद्यालयातून पाच विद्यालयातुन १५५७ विद्यार्थिनींना एकत्रित प्रशिक्षण देण्यात आले.
माता भगिनींवर होणार अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी अभाविप शाळा, महाविद्यालयात जाऊन संवाद साधत आहे. त्यातून विद्यार्थिनींना मिशन साहसीचे प्रशिक्षण देऊ, आणि माता भगिनींना सक्षम करू असे प्रतिपादन कार्यक्र माचे प्रमुख वक्ते प्रमोद कराड यांनी केले. तसेच, जेथे स्त्रियांवर अत्याचार होतील, तिथे जाऊन त्यास वाचा फोडण्याचा काम करू असे मार्गदर्शन डॉ. निलेश गायकवाड यांनी विद्यार्थिनींना केले.