विणी हंगामात पालघरच्या किनाऱ्याकडे कासवांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 11:49 PM2019-01-17T23:49:47+5:302019-01-17T23:50:02+5:30

कासवमित्रांचा आरोप : वाढती रेतीचोरी, बकाल चौपाट्या ठरतात कारणीभूत

Lessons of Tasavya on the coast of Palghar during the spring season | विणी हंगामात पालघरच्या किनाऱ्याकडे कासवांची पाठ

विणी हंगामात पालघरच्या किनाऱ्याकडे कासवांची पाठ

googlenewsNext

- अनिरुद्ध पाटील


बोर्डी : दक्षिण कोकणाच्या किनाºयावर समुद्री कासवांच्या विणी हंगामाला प्रारंभ झाला आहे. मात्र, उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यात एकाही कासवाने अंडी दिल्याची घटना मागील दहा-पंधरा वर्षात आढळलेली नाही. वाढती रेतीचोरी, समुद्रातील सर्व्हेक्षणातून वाढते रेडिएशन, उच्चतम भरतीरेषेनजीक अतिक्र मणं आणि पर्यटनाच्या नावाखाली मानवी हस्तक्षेपामुळे कासवांनी येथे पाठ फिरवल्याचा मुद्दा कासवमित्रांनी उपस्थित केला आहे.


पालघर जिल्ह्याला सव्वाशे किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून त्यामध्ये डहाणू तालुक्यातील ३५ किमीचा समावेश आहे. येथे आॅलिव्ह रीडले, ग्रीन सी, लॉन्गरहेड आणि हॉक्सबिल या चार जातींची कासवं आढळतात. एकीकडे दक्षिण कोकणातील किनाºयावर येऊन कासवांनी अंडी देण्यास सुरु वात केली आहे. मात्र, पालघर जिल्ह्यात साधारणत: २००४ सालापासून कासवांनी अंडी दिल्याची घटना ऐकिवात नसल्याची माहिती कासविमत्रांनी दिली.


समुद्रात विविध कारणांनी वाढत्या सर्व्हेक्षणामुळे निर्माण होणारे रेडिएशन, पर्यटनाच्या नावाखाली वाढलेला अति मानवी हस्तक्षेप, सुशोभीकरणाकरिता लावलेले विजेचे दिवे, करमणुकीकरिता लावलेले साहित्य, बैठक व्यवस्था निर्माण केल्याने रात्री उशिरापर्यंत माणसांचा वावर, पर्यटनाच्या नावाखाली भौतिक सुविधा व धांगडधिंगा, ओहटीवेळी थेट समुद्रात वाहनं उतरवून होणारी रेतीचोरी, प्रस्तावित वाढवण बंदर ही त्यामागील प्रमुख कारणं असल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे. तर १९९१ साली डहाणू पर्यावरण प्राधिकारणाची स्थापना झाल्यानंतर हा तालुका पर्यावरणदष्ट््या अतिसंवेदनशील घोषित झाला. त्यामुळे किनाºयालगत बांधकामांवर मर्यादा आहे. मात्र, पाणथळ जागा तसेच खाजण क्षेत्रावरही भराव घालून काँक्र ीडीकरणाचे झपाट्याने वाढते जंगल हा धोका आहे. ही पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी प्रशासनाकडून कोणतीच हालचाल होत नाही.


डहाणू पर्यावरण प्राधिकरणाचे अध्यक्ष निवृत्त माजी न्यायाधीश अँड. चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यामुळे तर रक्षणकर्ताच हरपल्याची स्थानिकांची भावना आहे. अपप्रवृत्तीविरु द्ध आवाज उठविणाºयांची प्रशासनाकडून गळचेपी केली जात असल्याचा आरोपही होत आहे. दरवर्षी पन्नास पेक्षा अधिक जखमी कासवं पारनाका येथील वन विभागाच्या आवारात उभारलेल्या देशातील एकमेव सुश्रुषा केंद्रात आणली जातात. वाईल्डलाइफ कन्झर्वेशन अँड अ‍ॅनिमल वेल्फेयर असोसिएशन या संस्थेचे सदस्य त्याकरिता दिवसरात्र झटतात. या सर्व समस्यांचे निराकरण झाल्यास, या भागात कासवं पुन्हा अंडी घालण्यास येऊन हे नंदनवन पुन्हा बहरेल अशी आशा व्यक्त होत आहे.

अतिहस्तक्षेपाने कासवांची पाठ
झाई, बोर्डी, घोलवड, चिखले, नरपड, आगर, सतीपाडा, डहाणू गाव ते थेट वाढवण, चिंचणीपर्यंतच्या किनाºयावर कासवांची मादी अंडी द्यायला यायची. किनाºयालगतचे वाळूचे साठे, रेताडजमीन, केवड्याचे बन हे क्षेत्र निवडले जायचे. खडयात अंडी घातल्यानंतर मर्यादावेल तसेच अन्य वनस्पतीने हा भाग आच्छादित केला जायचा.
च्मात्र मानवाच्या अति हस्तक्षेपाने कासवांनी पाठ फिरवली. किनाºयावर धूप प्रतिबंधक बंधारे आणि रचलेले दगड हा कासवांकरिता मोठा अडथळा ठरतो. किमान दशकभर मूठभर वाळूचा उपसा न झाल्यास गतवैभव प्राप्त होईल असे पर्यावरण तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

दहा ते पंधरा वर्षांत अंडी घातल्याची नोंद नाही : उच्चतम भरती रेषा ओलांडून कासवांची मादी अंडी घालण्यास येते. पाण्याच्या संपर्कात येऊन अंडी कुजू नयेत हे त्यामागे प्रमुख कारण आहे. मात्र मागील १० ते १५ वर्षांपासून कासवांनी अंडी दिल्याची जिल्ह्यात एकही घटना घडलेली नाही. किनाºयावर वाढलेला मानवी हस्तक्षेप, सीआरझेडचे खुलेआम उल्लंघण करून वाढलेली बांधकामं आदी अडथळा ठरणारी प्रमुख कारणं आहेत. डहाणू पर्यावरण संरक्षण हटवण्याचा घाट घातला जात आहे. शासन आणि स्थानिकांनी त्याकडे गांभीर्याने पाहणं अत्यावश्यक आहे.
 

दरवर्षी जखमी कासवांची संख्या झपाट्याने वाढणं ही समुद्री पर्यावरणाला आणि कासवांच्या अिस्तत्वाला धोक्याचा निर्देश आहे. - धवल कंसारा, संस्थापक, वाईल्डलाइफ कन्झर्वेशन अँड अ‍ॅनिमल वेल्फेयर

Web Title: Lessons of Tasavya on the coast of Palghar during the spring season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.