विरार पश्चिमेच्या भाजी मंडईकडे विक्रेत्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 11:04 PM2019-01-28T23:04:28+5:302019-01-28T23:04:48+5:30

अधिकृत जागा असतांनाही होते अतिक्रमण

Lessons of Vendors to the Western Market in Virar | विरार पश्चिमेच्या भाजी मंडईकडे विक्रेत्यांची पाठ

विरार पश्चिमेच्या भाजी मंडईकडे विक्रेत्यांची पाठ

Next

विरार : विरार पश्चिमेला असणाऱ्या विराटनगर येथील भाजी मंडईचीअवस्था दयनीय झाली असून विक्रेते येथे बसत नसल्याने ग्राहक देखील येथे फिरकत नाही. मार्केट सोडून भाजी विक्रेते फुटपाथ वर भाजी विकायला बसतात त्यामुळे वाहतूक कोंडी होते. याच कारणामुळे रस्त्यावर अस्वच्छता होते.

स्व. भास्कर ठाकूर हीे भाजी मंडई गेल्या दोन वर्षांपासून असून नसल्यासारखे आहे. रस्त्यावर बसणाºया फेरीवाल्यांमुळे वाहतुक कोंडीचे प्रमाण देखील वाढत असल्यामुळे महापालिकेने भाजीवाल्यांना भाजी मंडई उपलब्ध करून दिले होती. तरीदेखील वाहतूक कोंडीचा प्रश्न अजून पूर्णपणे सुटलेला नाही आहे. विरार पश्चिमेला विराट नगरमध्ये असलेले ही मंडई सर्वात जुने आहे.

सध्या येथे फक्त दोनच भाजीवाले असून ते आपल्या जागेचा भाडा भरतात. व्यवसाय होत नसल्याने हा भाडा त्याना भुर्दंड ठरत आहे. बाहर बसल्यास दोन हजाराचे दंड बसत आहे. या मंडईमध्ये कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. या मंडईची अर्धी जागा आता पालिकेने बेघरांसाठी वस्ती बनवण्याकरिता वापरली असून उरलेल्या जागेत भंगार ठेवले आहे. त्यामुळे महापालिकेने ही मंडई भाजी वाल्यांसाठी उभारली की बेघरांना राहण्याचे ठिकाण म्हणून हा प्रश्न निर्माण झाला आहे.

बाजारात येऊन बसा, असे आम्ही अनेकदा भाजीवाल्यांना सांगितले. जाहिराती देखील काढल्या मात्र, ते यायला बघत नाही. २५ भाजीवाले आले तरी आम्ही ते पुन्हा व्यवस्थित सुरु करू, त्याची दुरुस्ती करू. मात्र ते येत नाहीत. कारण त्या मार्केट मध्ये ग्राहक वळत नाहीत. लोकांना सवय झालेली आहे, चालताचालता रस्त्यात पटकन भाजी घ्यायची त्यामुळे मुद्दाम कोणी आत यायला धजत नाही. म्हणून ही समस्या वाढलेली आहे.
- किशोर गावस (उपायुक्त)

Web Title: Lessons of Vendors to the Western Market in Virar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.