केळव्यात कासवांना मिळाले जीवदान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 06:45 AM2019-06-23T06:45:47+5:302019-06-23T06:46:25+5:30
केळवे येथील खाडीतील मासेमारी करणाऱ्या काही मच्छीमारांनी जाळ्यात अडकलेल्या तीन कासवांची सुखरूप सुटका केली.
पालघर : केळवे येथील खाडीतील मासेमारी करणाऱ्या काही मच्छीमारांनी जाळ्यात अडकलेल्या तीन कासवांची सुखरूप सुटका केली. या कासवांना वनविभाग सफाळे यांच्या मदतीने डहाणूच्या वाईल्ड लाईफ कंझर्व्हेशन अँड अॅनिमल असोसिएशनच्या ताब्यात दिले.
केळवे येथील स्थानिक मच्छीमार भुपेंद्र मेहेर, मनोज तांडेल, अनंत तांडेल हे तिघे खाडीत मांडलेल्या डोल नेट जाळीत जमलेले मासे आणण्यासाठी शुक्र वारी २ च्या दरम्यान गेले होते. होडी वल्हविताना त्यांना पाण्याच्या पृष्ठभागावर वाहत जाणाºया जाळ्यात काहीतरी हालचाल दिसून आली. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता काही टाकाऊ जाळ्यांच्या तुकड्यात तीन कासवे जखमी अवस्थेत होती. त्यांनी वागरा प्रकारच्या जाळ्यांचे सर्व तुकडे एकत्र करीत त्या कासवासह किनाºयावर आणले.
मच्छीमारांनी जाळ््यातून त्यांना सोडविण्याचे प्रयत्न केले असता ते जखमी अवस्थेत अडकल्याचे दिसून आले.
त्या कासवांची सुटका करून त्यांना विहिरीच्या टाकीत ठेवण्यात आले. त्यांच्या जखमेवर हळद लावून रक्तस्त्राव थांबविण्याचा प्रयत्न स्थानिकांनी सुरू केला. मात्र एका कासवाचा पाय पूर्णपणे तुटलेल्या अवस्थेत असल्याने सफाळे येथील वनविभागाच्या अधिकारी संखे यांना पाचारण करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश प्रभू तेंडोलकर यांच्या मदतीने डहाणू च्या वाईल्ड लाईफ कंझर्वेशन अँड अॅनिमल असोसिएशनशी संपर्क साधून त्यांच्या कडे ही जखमी कासवे सुपूर्द करण्यात आली.