जनजीवन विस्कळीत

By admin | Published: July 22, 2015 03:36 AM2015-07-22T03:36:18+5:302015-07-22T03:36:18+5:30

तब्बल २९ दिवसाच्या दिर्घ विश्रांतीनंतर पडलेल्या मुसळधार पावसामुळे बोईसर तारापूरसह संपूर्ण पालघर जिल्ह्यातील जनजीवन

Life-threatening disorder | जनजीवन विस्कळीत

जनजीवन विस्कळीत

Next

बोईसर : तब्बल २९ दिवसाच्या दिर्घ विश्रांतीनंतर पडलेल्या मुसळधार पावसामुळे बोईसर तारापूरसह संपूर्ण पालघर जिल्ह्यातील जनजीवन आज पूर्णपणे विस्कळीत झाले. गेल्या चोवीस तासात पालघरला ४७५ मि. मि. तर बोईसरला ३४६.५ मि. मि. पाऊस पडल्याने रेल्वे विस्कळीत होऊन प्रवाशांचे प्रचंड हाल झाले तर अनेक गावांचा संपर्क तुटून वाहतूकही ठप्प झाली होती. अनेक ठिकाणी पुरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती तर आर्थिक व्यवहारही ठप्प झाले होते. मुसळधार पाऊस पडल्याने बोईसरच्या अनेक भागांसह भिमनगर, सरावली, बेटेगाव, आलेवाडी, उमरोळी, तारापुर एमआयडीसी अशा अनेक ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात साचले होते. बेटेगावच्या पुलावरून दोन ते तीन फुट उंचीवरून पाणी प्रचंड वेगाने वाहत होते. सरावली गावातील विनायक घरत, हेमा राऊत, बिपीन राऊत, मोहन घरत यांच्या घरात पाणी शिरल्याचे तेथील तलाठ्यांनी सांगितले मात्र उर्वरीत गावातील तलाठ्याचा संपर्क न झाल्याने किती नुकसान झाले या संदर्भात माहिती मिळाली नाही. बोईसर-पालघर रस्त्यावरील सरावली व उमरोळी येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने या मुख्य रस्त्यावरील वाहतूक ठप्प होती. बेटेगाव येथील शिदोबाचे मंदिर पाण्यात बुडाले होते. बोईसर ते राष्ट्रीय महामार्गावरील छोट्या वाहनांची वाहतूक बंद होती.

वीज खंडीत, संपर्क तुटला
अनेक ठिकाणी झाडे कोसळली तर वीजेच्या तारा तुटून किनारपट्टी वरील मुरबे, आलेवाडी, नांदगाव, तारापुर, नवापुर येथील वीजप्रवाह खंडीत झाला होता. बोईसर येथील बँका, इन्शुरन्स कार्यालये व इतर शासकीय कार्यालयात मुंबई व इतर भागातुन येणारे कर्मचारी न आल्याने आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. शाळा कॉलेजही बंद ठेवण्यात आल्या होत्या. तारापुर एमआयडीसी तील काही रस्ते पाण्याने व्यापले होते. तर कारखान्यांतही अनुपस्थीती मुले उत्पादनावर परीणाम झाला होता. एकुणच सर्वत्रच पाणी पाणी झाले होते. मात्र दुपारनंतर पावसाने थोडी विश्रांती घेतल्याने थोडा दिलासा मिळाला.
लोकल विस्कळीत
रात्री १.२२ पासून रेल्वे विस्कळीत झाली त्यामुळे विरार-डहाणू दरम्यान धावणाऱ्या बहुसंख्य लोकल तसेच लांबपल्ल्यांच्या गुजरात एक्स्प्रेस, सौराष्ट्र एक्स्प्रेस, अहमदाबाद पॅसेंजर रद्द करण्यात आल्या होत्या. लांब पल्ल्याच्या काही गाड्या धिम्या गतीने सुरू होत्या. त्यांना विरार-डहाणू दरम्यान थांबा दिल्याने प्रवाशांना काहीसा दिलासा मिळला. बोईसरलाही रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले होते. फलाटावरील उपहारगृहातील सर्व वस्तू संपल्या होत्या.

1पारोळ : सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे वसई पूर्व भागातील जनजीवन ठप्प झाले. उसगाव, भाताणे, शिरवली, आडणे, सायवन, मेढे, हे पूल पाण्याखाली गेल्यामुळे १७ गावांचा संपर्क तुटला, तसेच चांदीप, खानिवडे, कोपर, नवसई, जांबुलपाडा, या तानसा नदीच्या काठावर गावात अनेक घरांत पुराचे पाणी घुसल्यामुळे अन्नधान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
2चांदीप गावामध्ये रेती काढणारे मजूर नदीत अडकल्याने त्यांना वसई विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले. तसेच शिरसाड अंबाडी मार्गावरील शिरवली व घाटेघर हा मार्ग पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प होऊन शहराचा या भागाशी संपर्क तुटला. पुरामुळे शेतकऱ्यांची रोप वाहून गेल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. तसेच या भागातील वाहतूक यंत्रणा कोलमडून पडल्याने याचा फटका कामगार, शालेय विद्यार्थी यांना बसला. सुरक्षेचा उपाय म्हणून या भागातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या.
वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या धरणाच्या मासवण पंपींग स्टेशन परिसरात काल रात्रीपासून धुवाँधार पाऊस पडता आहे. त्यामुळे येथील नदीला पूर आला असून पंपींग स्टेशनच्या विहिरीत गाळ जमा झाला आहे. त्यामुळे येत्या दोन तीन दिवसात वसई विरारचा पाणीपुरवठा अनियमीत व कमी प्रमाणात होण्याची शक्यता वसई विरार शहर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या सूत्राने व्यक्त केली आहे.
सूर्या प्रकल्पाच्या मासवण पंपींग स्टेशन परिसरात सतत पाऊस कोसळत असल्यामुळे येथील नदीला पूर आला आहे. त्यामुळे कचरा व गाळ विहिरीत जमा झाल्यामुळे पाणी खेचणाऱ्या पंपाची क्षमता कमी झाली आहे.

Web Title: Life-threatening disorder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.