शिव मंदिरात निर्मिले तुपाचे कमळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 10:57 PM2019-08-31T22:57:34+5:302019-08-31T22:58:04+5:30
चिंचणी गावातील अनोखी प्रथा । मंदिराला पेशवेकालीन इतिहास
डहाणू/बोर्डी : पिठोरी अमावस्येनिमित्त दरवर्षी चिंचणी गावातील नागेश्वरी शिव मंदिरात आणि सामुद्री येथील शिव मंदिरात तुपापासून कमळ पुष्प बनविण्याची प्रथा आहे.
या अमावस्येच्या आदल्या रात्री भक्त मंडळी एकत्र येऊन त्याची निर्मिती करून भक्तिभावाने पूजन करतात. त्यानंतर अमावस्येच्या दिवशी उष्णतेने तूप विरघळू लागल्यावर त्याचे उद्यापन केले जाते. यापूर्वी जयेश गोस्वामी हे त्याची निर्मिती करत तर यावर्षी संजय गोस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली कलाकृती साकारण्यात आली आहे. मागील अनेक वर्ष ही प्रथा चालत आल्याची माहिती स्थानिकांनी दिली. तर श्री नागेश्वर महादेव मंदिर हे स्वयंभू असून त्याची स्थापना १७३९ रोजी श्रीमंत चिमाजी आप्पा पेशवे यांनी केल्याचा इतिहास आहे.