पालघर पोटनिवडणुकीसाठी मीरा भार्इंदरमध्ये दारुबंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2018 05:30 PM2018-05-26T17:30:54+5:302018-05-26T17:30:54+5:30
पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मीरा भार्इंदरमध्येदेखील दारुबंदी लागू करण्यात आली आहे.
मीरा रोड - पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मीरा भार्इंदरमध्येदेखील दारुबंदी लागू करण्यात आली आहे. 28 मे मतदानाच्या दिवशी सायंकाळपर्यंत तसेच 31 मे रोजी निकालाच्या दिवशी दारुबंदी राहणार आहे. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीची गरमागरमी चांगलीच सुरू असून जिल्हा हद्दीपासून 5 किमी अंतराच्या आत येत असल्याने मीरा भार्इंदर शहरातसुद्धा दारुबंदी लागू करण्यात आली आहे. पोटनिवडणुकीमुळे पालघर जिल्ह्यात दारुबंदी असल्याने मोठ्या प्रमाणात तेथील मद्यपी मीरा भार्इंदरमध्ये येणार अशी शहरातील बार चालकांना आशा होती. परंतु मीरा भार्इंदरमध्ये दारुबंदी लागू केल्याने आॅर्केस्ट्रा बार व अन्य बार चालकांमध्ये खळबळ उडाली.
दारुबंदीच्या विरोधात बार चालकांच्या काशिमीरा हॉटेल असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु न्यायालयाने देखील या बार चालकांची याचीका फेटाळुन लावली. त्यामुळे शहरात शनिवारी संध्याकाळपासून (26 मे) 28 मे म्हणजेच मतदानाच्या दिवशी संध्याकाळपर्यंत दारुबंदी असेल. शिवाय 31 मे रोजी निकालादिवशीदेखील दारूबंदी राहणार आहे. या काळात सर्व बार, वाईन व बियर शॉप बंद राहणार आहेत.