बनावट प्रमाणपत्राद्वारे बँकेकडून मिळवले कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 06:00 AM2017-11-27T06:00:44+5:302017-11-27T06:00:54+5:30
सहकारी गृहनिर्माण संस्थेचे बनावट शिक्के वापरून तयार केलेल्या ना हरकत प्रमाणपत्राद्वारे बँकेकडून १४ लाखांचे कर्ज मिळवणा-या सहा जणांच्या टोळीविरुद्ध वसई पोलिसांनी नुकताच गुन्हा दाखल केला आहे.
वसई : सहकारी गृहनिर्माण संस्थेचे बनावट शिक्के वापरून तयार केलेल्या ना हरकत प्रमाणपत्राद्वारे बँकेकडून १४ लाखांचे कर्ज मिळवणा-या सहा जणांच्या टोळीविरुद्ध वसई पोलिसांनी नुकताच गुन्हा दाखल केला आहे.
स्विट सहारा सहकारी गृहनिर्माण संस्थेचे समिती सदस्य चंद्रकांत कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वसई न्यायालयाच्या आदेशान्वये वसई पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. सोमनाथ विभुते, सुधाकर कापसे, सचिन कापसे, सर्वजित तिवारी, चुडामन पाटील आणि चंद्रकांत दावडा अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी सुधाकर कापसे व सचिन कापसे यांनी संस्थेच्या समितीची परवानगी नसताना बनावट शिक्क्यांचा वापर करून तयार केलेल्या गृहनिर्माण संस्थेच्या ना हरकत प्रमाणपत्राद्वारे बँकेतून १४ लाख रुपयांचे कर्ज घेतल्याची तक्रार आहे. बनावट शिक्के कुठे आणि कोणाच्या साहाय्याने तयार केले, त्यांचा वापर कुठे करण्यात आला व या गुन्ह्यात अजून किती गुन्हेगारांचा समावेश आहे याचा तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक सागर टिळेकर करीत आहेत.
बनावट शिक्के कुठे तयार केले, त्यांचा वापर कुठे करण्यात आला व या गुन्ह्यात अजून किती गुन्हेगारांचा समावेश आहे, याचा तपास केला जात आहे.