‘शिट्टी’ मिळू नये म्हणून पालघरात रात्रभर लॉबिंग; चिन्हच गोठवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 12:19 AM2019-04-13T00:19:46+5:302019-04-13T06:52:39+5:30
अर्ज छाननी उशिरापर्यंत रेंगाळली : चेतन पाटील यांच्या माघारीनंतर शिवसैनिकांची गर्दी
पालघर : गुरु वारी झालेल्या छाननी दरम्यान बहुजन महापार्टीच्या चेतन पाटील यांना अधिकृत उमेदवारी मिळाल्यानंतर शुक्रवारी त्यांनी आपली उमेदवारी माघार घेतल्याने बविआ ला शिट्टी चिन्ह मिळू नये यासाठी सेना-भाजप च्या वरीष्ठासह शेकडो शिवसैनिकांची मोठी गर्दी जिल्हाधिकारी कार्यालया समोर केली होती. शह-काटशहाच्या या लढ्यात निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या दालनात रात्री उशिरा पर्यंत युक्तिवाद सुरु होता. दरम्यान, बहुजन विकास आघाडी ची शिट्टी चिन्हांची मागणी अमान्य करीत शिटी चिन्ह निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गोठवून ठेवीत रिक्षा हे चिन्ह दिले आहे.
शुक्रवारी अर्ज छाननी दरम्यान चेतन जिल्हाधिकारी कार्यालयात येणार असल्याने शिवसेनेची मोठी गर्दी जमली होती. त्यासाठी त्यांनी मागितलेल्या पोलीस सरंक्षणाबाबत न्यायालयाने हे प्रकरण आपल्या कार्यक्षेत्रात येत नसल्याची भूमिका घेतली. त्यातवर त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांना लेखी पत्र देऊन त्याचे अधिकार आपल्या प्रतिनिधीला (सूचक) दिले होते. मात्र, त्यांनी प्रत्यक्षात उपस्थित राहून आपले म्हणणे मांडावे लागेल असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगून चेतन याला पोलीस बंदोबस्तात आणण्याचे आदेश दिले. बहुजन महापार्टीचे उमेदवार राजू लडे आणि चेतन पाटील या दोन उमेदवारांना बहुजन महापार्टी ने ए बी फॉर्म दिले होते. ३ एप्रिल रोजी राजू लढे यांनी एबी फॉर्म जोडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होत. मात्र त्यानंतर चेतन पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बहुजन महापार्टीचा एबी फॉर्म भरत लडे हे बहुजन पार्टीचे अधिकृत उमेदवार नाहीत असे नमूद केले. त्यामूळे गुरु वारी झालेल्या उमेदवारी अर्जाच्या छाननी दरम्यान राजू लडे हे अपक्ष व चेतन पाटील हे बहुजन महापर्टीचे अधिकृत उमेदवार घोषित करण्यात आले होते.
बविआ पक्षाकडून उच्च न्यायालयात आपल्या उमेदवाराला शिट्टी हे चिन्ह मिळण्याबाबत याचिका दाखल करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्याना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाºयाकडे जाण्याच्या सुचना केल्या. त्या अनुषंगाने त्यानी या पूर्वी आमचे उमेदवार बळीराम जाधव हे २००९ च्या निवडणुकीत शिट्टी या चिन्हावर निवडून आल्याने हे आपल्यालाच मिळावे असा दावा केला. तर दुसरी कडे छाननी दरम्यान उरलेल्या पक्षातील उमेदवारा मध्ये आमचा बविआ पक्ष हा निवडणूक निर्णय अधिकाºया कडे नोंदणीकृत असल्याने शिट्टी हे चिन्ह आम्हालाच मिळावे असा दुहेरी दावा बविआ कडून करण्यात आला आहे.
या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱयांकडे रात्री ७.३० वाजता सुनावणी ठेवण्यात आली होती. 12.30 नंतर रात्उरी शिरा पर्यंत त्यावर दोन्ही पक्षकारांच्या बाजूने युक्तिवाद सुरू होते. अखेर शिट्टी हे चिन्हच गोठविण्यात आले.
एबी फॉर्ममध्ये खाडाखोड केल्याने गुन्हा
महापार्टी कडून अपक्ष ठरलेले उमेदवार राजू लडे हे आदिवासी उमेदवार असल्याने ते माझ्याकडे न्याय मागण्यासाठी आले असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले. मात्र बहुजन विकास आघाडीकडून शिट्टी हे चिन्ह हिसकावून घेण्याची चांगली संधी असल्याने सेनेने या प्रकरणात उडी घेतली होती.
बहुजन महापार्टी चे उमेदवार चेतन पाटील यांनी पक्षाने दिलेल्या अधिकृत उमेदवाराने पक्षाने दिलेल्या एबी फॉर्ममध्ये खाडाखोड केल्या प्रकरणी सातपाटी सागरी पोलीस स्थानकात भादवी कलम ४२० अन्वये गुन्हा नोंद केला होता. शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकाºयां समोर आपले म्हणान माबडून तो बाहेर आल्या नंतर पोलिसांनी त्याला अटक केली.