लोकमत इफेक्ट - परिवहन विभागातर्फे अखेर ट्रॅव्हल्सना दणका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 11:14 PM2019-06-12T23:14:21+5:302019-06-12T23:14:50+5:30
तीन जणांना दंड : आता तरी लूट थांबणार?
विरार : अखेर लोकमतच्या पाठ पुराव्या नंतर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांकडून नियमापेक्षा अधिक भाडे आकारणाºया विरार येथील खासगी ट्रॅव्हल्सना वसई परिवहन विभागाने अखेर दंड आकारला आहे. ९ जणांना नोटीसा पाठवून ३ जणांकडून दंड वसूल केला आहे. या आधी परिवहन विभागाने केवळ नोटीसा बजावल्या होत्या पण लोकमत मध्ये कारवाई होत नसल्याची बातमी आल्यानंतर या खासगी ट्रॅव्हल्सवर दंडाची कारवाई परिवहन विभागाने केली आहे.
उन्हाळी सुट्टीनिमित्त गावी जाणाºया खास करून कोकणात जाणाºया प्रवाशांकडून अवाढव्य भाडं घेऊन त्यांना लुटण्याचे काम खासगी ट्रॅव्हल्स करत होते. तर परिवहन विभागाला याबाबतची माहिती मिळाल्यानंतर परिवहन विभागाच्या पथकाने १० मे रोजी वसई फाटा, मनवेलपाडा तलाव, विरार फाटा आदी ठिकाणी या खासगी ट्रॅव्हल्सची तपासणी केली. यातील काही खासगी ट्रॅव्हल्सकडे परवाने देखील नसल्याचे समोर आले होते. त्यावेळी परिवहन विभागाने या खासगी ट्रॅव्हल्सला नोटीस बजावल्या होत्या.
आता परिवहन विभागाने सक्त कारवाईला सुरवात केली असून त्यातील एमएच- ४८ -के- ३९९४ कडून २६ हजार ९२८ रु पये, एमएच-०४ -जेके- ९६१९ कडून १८०० रु पये तर एमएच-०८ -ई-९३९६ कडून २४०० रु पये दंड वसूल करण्यात आला आहे.
असे एकूण ३१ हजार इतका दंड वसूल करण्यात आला आहे. तर इतर खासगी ट्रॅव्हल्सना नोटीसा पाठवण्यात आल्या असून त्यांच्यावर देखील लवकरच कारवाई करण्यात येणार आहे.
पुढील कारवाई सुरु आहे. कारवाई आता कुठेच थांबणार नाही अनिधकृत खासगी ट्रॅव्हल्स ना आता थारा नाही.
- एन. एन. पाटील,
परिवहन विभाग अधिकारी