मध्यस्थीनंतर लॉँग मार्च स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 01:19 AM2018-08-16T01:19:35+5:302018-08-16T01:19:58+5:30

जिल्ह्यातील रिलायन्स गॅस पाईप टाकण्यासाठी शेतकऱ्याच्या घेतलेल्या जमिनीचा योग्य मोबदला १५ दिवसात शेतक-यांना दिला जाईल

Long-term suspension | मध्यस्थीनंतर लॉँग मार्च स्थगित

मध्यस्थीनंतर लॉँग मार्च स्थगित

Next

- हितेन नाईक
पालघर - जिल्ह्यातील रिलायन्स गॅस पाईप टाकण्यासाठी शेतकऱ्याच्या घेतलेल्या जमिनीचा योग्य मोबदला १५ दिवसात शेतक-यांना दिला जाईल असे खा. राजेंद्र गावितांच्या मध्यस्ती नंतर मुख्यमंत्र्यांनी दिल्याने अखेर पालघरमधून मुंबईकडे निघालेला लॉँग मार्च मंगळवारी मुंबईत पोहोचल्यानंतर स्थगित करण्यात आला आहे.
पालघरच्या मुंबई-अहमदाबाद महामार्गा वरील ढेकाळे येथून रविवारी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स गॅस पाईप लाईन विरोधात मुंबईच्या दिशेने निघलेला लॉँग मार्च मुंबईच्या वेशिवर जाऊन स्थगित करण्यात आला आहे.
गुजरात मधील दहेज ते महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातील नागोठणे पर्यंत रिलायंस ईथेन गॅस पाईप लाईनच काम २०१५ साली सुरु करण्यात आले. मात्र, या वेळी संपादित केलेल्या जमीनिंचा मोबादला देताना रिलायंस कडून तलासरी, डहाणू, पालघर, विक्र मगड, वाडा मधील आदिवासी शेतकºयांची फसवणूक झाल्याचा आरोप करत हजारो शेतकºयांनी हा लॉंग मार्च काढला होता.
जिल्ह्यातील मनोर जवळील ढेकाळे येथुन १२ तारखेला निघलेला हजारो शेतकºयांचा मोर्चा १५ आॅगस्ट रोजी मुकेश अंबानी यांच्या निवास्थानी पोचून त्यांच्या बंगल्या समोर सर्व मोर्चेकºयांच्यावतीने ठीय्या आंदोलन करण्यात येणार होते. मात्र, मुंबईतील सीमेवर दहिसर येथे लॉँग मार्च पोहचताच पालघर चे खासदार राजेंद्र गावित यांच्या मध्यस्तीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलन कर्त्यांना चर्चेच निमंत्रण दिले. मोर्चेकरी आणि प्रशासन यांच्यात सकारात्मक चर्चा झाल्यानंतर हा मार्च पुढे स्थगित करण्यात आला.
या चर्चे दरम्यान खासदार राजेंद्र गावित यांच्यासह गेलेल्या शेतकºयांच्या शिष्टमंडळाने जिल्ह्यात शेतकºयांच्या झालेल्या फसवणुकी बाबत मुख्यमंत्र्याना माहिती दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्चर्य व संताप व्यक्त करत या संदर्भात येत्या १५ दिवसात महसूल आयुक्त, पालघर जिल्हाधिकारी, खासदार राजेंद्र गावित यांच्या सह काही शेतकºयांची कमिटी तयार करणार असून आदिवासी शेतकºयांवर झालेला अन्याय दूर करून त्यांना न्याय देऊ तसेच योग्य मोबादला दिला जात नाही तोपर्यंत रिलायंस ला जिल्ह्यात कोणतही काम न करू देण्याचे निर्देश दिले आहेत.

मुख्यमंत्री आश्चर्यचकित

रिलायंस कडून शेतकºयांच्या सातबारा उतारा आणि फेरफार चढ़वण्यात आलेला बोजा त्वरित रद्द करा असे निर्देश ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
शेतकºयांनी कंपनीची मनमानी सांगितल्यावर फडणविस यांनी आश्चर्य व्यक्त करुन अधिकाºयांना खडसावले.

Web Title: Long-term suspension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.